धरणगाव (प्रतिनिधी) येथील उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद कल्याण यांच्या मार्फत अशोक चौधरी यांना अहिराणी भाषेचे व खान्देश संस्कृतीचे जतन व संवर्धन केल्याबददल तसेच ऑडिओ व व्हिडिओ कॅसेटसच्या माध्यमातून समाजप्रबोधन व मनोरंजन केले. म्हणून हा पुरस्कार सचिन गोस्वामी मराठी चित्रपट व मालिका निर्माता मुंबई यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी अध्यक्ष विकास पाटील, बापूसाहेब पिंगळे, बापू हटकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबददल त्यांचे स्नेही, हितचिंतक, मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले.