धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अहिरे खुर्द येथे किरकोळ वादातून एकावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.
या संदर्भात कृष्णा कामचंद संदानशिव (वय ६६, व्यवसाय- शेतीकाम,रा. अहिरे खु.) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अहिरे गावी त्याच्या घरासमोर त्यांचा मुलगा व सुन यांच्यात किरकोळ वाद चालू होता. तेव्हा सर्जेराज रघुनाथ संदानशिव, सुमित सर्जेराज संदानशिव अन्य दोन महिलांनी (सर्व रा.अहिरे ता.) यांना असा संशय आला की, सुरु असलेली शिवीगाळ त्यांनाच केली जात आहे.
यावरून सुमित संदानशिव याने याने हातात विट उचलून कृष्णा संदानशिव यांचा गळा दाबून एका हातात विट घेवुन तोंडावर मारुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर इतरांनी देखील विटांनी हातावर तोडांवर, पायावर व डोक्यावर मारहान करून दुखापती करून तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. या प्रकरणी धरणगाव पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि उध्दव ढमाळे हे करत असून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.