जळगाव (प्रतिनिधी) कुलगुरू यांनी लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या प्रा. सुधीर भटकर यांचे पुस्तक प्रकाशन कोणाच्या सांगण्यावरून केले ते पण जाहीररित्या वर्तमान पत्राच्या माध्यमातून करावे. अशी मागणी महाविकास आघाडीच्या अधिसभा सदस्य विष्णू भंगाले, माजी अधिसभा सदस्य अतुल कदमबाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस सचिव अँड कुणाल पवार, जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे, भूषण भदाणे, यूवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील आदींनी केली आहे.
क ब चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मधील लैंगिक शोषणाचा आरोप असलेले प्रा. सुधीर भटकर यांच्या विषयी चौकशीची व दोषी असल्यास गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध विद्यार्थी संघटना यांनी केली आहे. पण कुलगुरूंना त्यासाठी चौकशी समिती नेमायला मागच्या दोन वर्षा पासून वेळ नाही. त्या विद्यार्थिनीला न्याय मिळवून न देता आरोप असलेली व्यक्तीच पुस्तक प्रकाशन करायला कुलगुरूंना वेळ मिळतो कसा? विद्यापीठच केंद्र बिंदू विद्यार्थि व विद्यार्थिनी असताना कुलगुरू हे कोणासाठी व कोणाच्या सांगण्यावरून काम करत आहे, कुलगुरूंना भेटल्यावर ते समिती दोन दिवसात नेमतो असे सांगतात व त्याच व्यक्तीचे पुस्तक प्रकाशन कुलगुरू करतात त्यामुळे कुलगुरू ह्यांच्या विषयी शंका निर्माण होत आहे, त्या विद्यार्थांनीस न्याय मिळेल की नाही याबाबत शंका निर्माण होत आहे, कुलगुरू ह्याच कारणामुळे कोणत्याही पत्रकाच उत्तर देत नाही. असे प्रश्न उपस्थित होत आहेत.