मुक्ताईनगर(प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे सुकळी येथील बंदिस्त गोठ्यातील तब्बल सात शेळ्या हिंस्र प्राण्याकडून ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
सुकळी येथील जि. प. शाळेमागे किशोर बाळू पाटील यांचा बंदिस्त वाडा आहे. या वाड्यात गायी-म्हशींसह बैल व शेळ्या बांधलेल्या असतात. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट अथवा लांडगा किंवा अन्य हिंस प्राण्याने लोखंडी गेटच्या खालील बाजूने वाड्यात प्रवेश करत तब्बल सात शेळ्या केल्या. यामुळे ठार पशुपालकाचे एक लाखापर्यंत नुकसान झाले आहे. घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. पहाटे किशोर पाटील गोठ्यात पोहोचताच हा प्रकार समोर आला. घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. वडोदा वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांना ग्रामस्थ पवन पाटील यांनी माहिती दिली. पाचपांडे, वनरक्षक विकास पाटील, वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांच्या वनमजूर संजय सांगळकर, योगेश मार्गदर्शनाखाली वनपाल डी. जी. कोळी यांनी पंचनामा केला.
शेळ्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी अश्विनी सत्ये यांना पाचारण करण्यात आले आहे, अशी माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, एक दिवस आधी शेजारी साहेबराव दयाराम कोळी यांची एक शेळी अशाच प्रकारे जखमी अवस्थेत मृत झाली होती. भटक्या कुत्र्यांचा हल्ला असावा, असा कयास लावला होता. मात्र, दुसयाच रात्री एकाचवेळी तब्बल सात शेळ्यांवर हल्ला चढवत ठार केल्याने, शिवाय घटनास्थळी हिस्र वन्यप्राण्याच्या पाऊलखुणा आढळून आल्याने हा हल्ला वन्यप्राण्याचाच असल्याचे सिद्ध होत आहे. या हल्ल्यात किशोर पाटील यांचे एक लाखापर्यंत नुकसान झाले, तर साहेबराव कोळी यांचे पंधरा हजारापर्यंत नुकसान झाले आहे.