जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील १५ मोटारसायकलीचे गुन्हे दाखल असणाऱ्या अट्टल चोरट्यास आज स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी जळगाव जिल्हयात चोरी होणारे मोटार सायकलचे गुन्हे तसेच चैन स्नॅचिंगचे उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरणकुमार बका यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील स.फौ. अशोक महाजन, शरीफ काझी, युनुस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव, उमेशगिरी गोसावी, वसंत लिंगायत, महेश महाजन, अशोक पाटील, मुरलीधर बारी यांचे पथक रवाना केले होते.
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनिय माहिती मिळाली की, जामनेर तालुक्यातील पिपळगांव बु येथील २० वर्षीय पारदर्शी हा तरुण जळगाव शहरात येवुन मोटार सायकली चोरुन घेवुन जात आहे. त्या अनुषंगाने वरील पथक हे सुमारे चार ते पाच दिवसापासुन पिपळगांव बु येथे जावुन थांबले होते. मोटार सायकलसह पारदर्शी उल्हास पाटील (वय २० रा. पिपळगांव बु ता. जामनेर) हा पिपळगांव बु येथुन पहूरकडे येत असतांना शेरी फाटयाजवळ त्यास मोटार सायकलसह ताब्यात घेतले असता सदर मोटार सायकल हा चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यास अधिक विचारपुस करता त्याने लॉकडॉउन काळातील मागील दोन महिन्यात जळगाव शहरातुन चोरी केलेल्या मोटार सायकल बाबतचे (MIDC पोलीस स्टेशन – ०६ गुन्हे, जिल्हापेठ पोलीस स्टेशन- ०७ गुन्हे, जळगाव शहर पोलीस स्टेशन – ०१ गुन्हा, शनिपेठ पोलीस स्टेशन – ०१ गुन्हा) असे एकुण १५ गुन्हयांची कबुली दिलेली आहे.