TheClearNews.Com
Tuesday, May 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सरकारी वकील विद्या राजपूत खून खटल्यात पतीला जन्मठेप तर सासऱ्याला चार वर्षाची शिक्षा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 13, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव प्रथम वर्ग न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत (३५, रा. सुपारीबाग, जामनेर) खून खटल्यात न्यायालयाने पतीला जन्मठेप तर सासऱ्याला चार वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, सरकार पक्षातर्फे सरकारी वकील केतन ढाके यांनी प्रभावी बाजू मांडली.

जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. कोरोनाच्या अवघड परिस्थितीतही केवळ तीन महिन्यात खटल्याचे कामकाज संपविण्यात आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सरकारी वकील असलेल्या विद्या राजपूत यांचा उशीने तॉड व गळा दाबून खून झाला होता. पती डॉ. भरत लालसिंग पाटील व सासरे लालसिंग श्रीपत पाटील (७४. रा. बेलखेडे, ता. भुसावळ) या दोघांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. विद्या राजपूत यांचा मृत्यू झाल्यानंतर पती व सासरे या दोघांनी त्यांना जामनेर व नंतर भुसावळ येथील दवाखान्यात नेले होते. प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगवेगळी कारणे सांगितली होती. भुसावळ येथे मृत घोषित केल्यानंतर मृतदेह परस्पर बेलखेडे (ता. भुसावळ) या मूळगावी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला होता, तेथे विद्या राजपूत यांचा मावस भाऊ गणेश सुरळकर व बहीण प्रिया सोळखे यांनी मृत्यूचे कारण विचारले असता हृदयविकाराने झाल्याचे पतीने सांगितले होते, मात्र बेहरा पाहिल्यानंतर शरीरावर जखमा होत्या. प्रकरण संशयास्पद वाटल्याने विद्या यांच्या नातेवाईकांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली असता, त्यासही पतीने विरोध केला. त्यामुळे ही माहिती वरणगाव पोलिसांना कळविण्यात आली. त्यांनी प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह वरणगाव रुग्णालयात नेला. तेथे पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन झाल्यानंतर विद्या राजपूत यांचा मृत्यू गुदमरून तसेच तोंड व गळा दाबून झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार पती डॉ. भरत पाटील व सासरे लालसिंग पाटील यांना लागलीच अटक करण्यात आली होती. नंतर जामनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

READ ALSO

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

चारित्र्याच्या संशयाने घेतला बळी विद्या राजपूत यांच्या चारित्र्यावर पतीकडून सतत संशय घेतला जात होता. त्या सतत मोबाईलवर बोलत असत. त्यामुळे त्यांच्यावर अधिक संशय घेऊन त्यांना मारहाण केली जात होती, असे चौकशीत समोर आले होते. साक्षीदारांची तपासणीदेखील हेच मुद्दे पुढे आले. सहकारी सरकारी वकील सुप्रिया क्षीरसागर यांच्याकडे त्यांनी मारहाणीची घटना कथन केली होती. त्याशिवाय नागपूर येथे प्रशिक्षणाला असताना पतीकडून होणाऱ्या छळाबाबत कैफियत मांडली होती.

जळगाव येथील बिग बाजारात खरेदी केल्यानंतर पर्समध्ये एटीएम नव्हते. हे एटीएम पतीने काढून घेतल्याचे नंतर उघड झाले होते, असे क्षीरसागर यांनी आपल्या साक्षीत सांगितले आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली, तर बचाव पक्षातर्फे एस. के. शिरुडे यांनी बाजू मांडली. गुन्हा घडल्यापासून पती डॉ. भरत पाटील हा कारागृहातच आहे.

यांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण

या खटल्यात १९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यापैकी १४ साक्षीदाराच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. त्यात फिर्यादी गणेश सुरळकर, ज्या डॉक्टरांकडे विद्या यांना उपचारासाठी नेण्यात आले ते डॉ. राहुल जावळे, डॉ. राजेश मानवतकर, चुलत भाऊ सूरज सरदारसिंग पाटील, ज्या वाहनातून त्यांना दवाखान्यात व नंतर अंत्यसंस्काराला नेण्यात आले त्याचा चालक विपुल गोपाल पटेल, मुलगा दुर्वेश ऊर्फ सोनू भरत पाटील, वहीण प्रिया प्रमोद सोळुखे, शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल चंद्रकांत कळसकर, वरणगाव पोलीस ठाण्याच्या तत्कालीन प्रभारी अधिकारी सारिका कोडापे, जामनेर शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा, जळगाव न्यायालयातील सरकारी वकील सुप्रिया सुरेश क्षीरसागर, जामनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, शवविच्छेदन करणारे डॉ. नीलेश देवराज व जामनेरचे वकील ज्ञानेश्वर बाबुराव बोरसे आटीच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. आज जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांनी विद्या पाटील यांच्या खून केला म्हणून तिचा पती डॉ.भरत पाटील याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर विद्या पाटील हीचा पती व सासरा लालसिंग पाटील यांना पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून दोघांना दोषी ठरवून प्रत्येकी चार वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली तर बचाव पक्षातर्फे एस.के. शिरुडे यांनी बाजू मांडली. दरम्यान गुन्हा घडल्यापासून पती डॉ. भरत पाटील हा कारागृहातच होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

May 11, 2026
जळगाव

इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

May 11, 2026
क्रीडा

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

May 11, 2026
गुन्हे

सुप्रीम कॉलनीत घराचा कडीकोयंडा कापून चोरट्यांची हातसफाई

May 11, 2026
गुन्हे

टॉवर चौकातील उपाध्ये लॉजमधील कुंटणखाण्यावर छापा

May 11, 2026
जळगाव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

May 10, 2026
Next Post

‘ब्रेक दि चेन’ साठी लागू केलेले निर्बंध एक जून २०२१ पर्यंत अंमलात राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी दोन जणांना अटक

March 21, 2021

पुणे हादरले : दिराने मध्यरात्री आईसह दोन मुलांना खून करून जाळले ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

April 6, 2023

गाणे बंद केल्याने मद्याच्या नशेत असलेल्या बापाकडून माय अन् लेकीला जबर मारहाण

August 18, 2025

नवाब मलिकांकडून केपी गोसावी आणि काशीफ खानचे व्हाट्सअप्प चॅट शेअर

November 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group