TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कृतज्ञता सोहळ्यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार !

प्रामाणिक सेवेतून आत्मिक समाधान मिळते ; जळगाव येथील राज्यस्तरीय मेळाव्यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

vijay waghmare by vijay waghmare
September 6, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जलजीवन मिशनमुळे पाणीपुरवठा विभागाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. पाणी पाजणे हे खरोखरच पुण्यकर्म आहे. यामुळे केवळ दुसऱ्यांना मदत होत नाही, तर आपल्यालाही आत्मिक समाधान मिळते.अडीच वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाद्वारे जनतेसाठी व कर्मचाऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले असून म. जी .प्रा. च्या सुमारे 450 अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांना नोकरीत समावेश केले असून राज्यातील 1074 हातपंप/वीजपंप कर्मचाऱ्यांचा 45 वर्षा पासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावून त्यांना सेवेत कायम सामावून घेता आल्याचे आत्मिक समाधान आहे. मंत्री पदाचा बडेजाव न करता पदाची गरीमा राखण्याचा सतत प्रयत्न केला आहे. आयुष्यात बरेच सत्कार स्वीकारले मात्र हा सत्कार नेहमी स्मरणात राहील. राज्यातील कर्मचाऱ्यांचे प्रेम पाहून मी भारावलो असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव येथिल आदित्य लॉन येथे आज राज्यस्तरीय हात पंप / वीजपंप दुरुस्ती कर्मचारी संघटने मार्फत भव्य नागरी सत्कार व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.

मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जल जीवन मिशन मुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आणि मुलांच्या जीवनात मोठा बदल घडवून येत असून या योजनेमुळे महिलांना आणि मुलांसाठी पाण्यासाठी लांब अंतरावर जावून डोक्यावर हंडे वाहण्याची गरज कमी झाली आहे. तुम्ही केलेल्या प्रेमाच्या सत्काराने काम करण्यासाठी उब मिळणार आहे. जेव्हा – जेंव्हा गरज भासेल तेव्हा – तेव्हा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे सांगितले.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

सन्मान पत्र व गणेश मूर्ती देवून पाणी पुरवठा मंत्र्यांचा भव्य सत्कार !

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी राज्यातील हातपंप/वीजपंप कर्मचारी संघटनेमार्फत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सन्मान पत्र तसेच श्रीगणेशाची चांदीची मूर्ती भेट देवून भव्य सत्कार करण्यात आला. कर्मचारी संघटने मार्फत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी लिहिलेल्या मानपत्राचे यावेळी वाचन प्रा. हर्षल पाटील यांनी केले त्यानंतर ते ना. गुलाबराव पाटील यांना प्रदान करण्यात आले.

शाहिरी पोवाड्याने उपस्थित झाले मंत्रमुग्ध !

मंत्री गुलाबराव पाटील यांचे आगमन होताच वाजत – गाजत – नाचत , फटाक्यांच्या आतषबाजीत फुलांची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात कर्मचार्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाहीर संग्राम जोशी व कलावंतानी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर संघर्षमय जीवनावरील शुण्यातूनही आकाश भेदिले … या पहाडी आवाजात सादर केलेल्या पोवाडयाने उपस्थीत मंत्रमुग्ध झाले होते.

प्रास्ताविकात संघटनेचे कार्यध्यक्ष संजय खोकले यांनी वर्षानुवर्ष प्रलंबीत असलेली मागणी व कर्मचा-यांचे वेतन व सेवानिवृत्ती वेतना बाबतच्या हाल अपेष्टा याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी गांभीर्याने दखल घेवून कर्मचाऱ्यांना कायम अनुदान देण्याबाबत ऐतिहासिक निर्णयामुळे दिलेले वचनपूर्ती केल्याने आम्ही राज्यातील हातंपप दुरुस्ती कर्मंचारी संघटना ना. गुलाबराव पाटील यांचे ऋण व्यक्त करीत असल्याचे सांगून कार्यक्रमाचे महत्व विषद केले. हे सांगताना उपस्थितांच्या चेहऱ्यावर कृतज्ञता तर होतीच पण खूप मोठा आनंदही होता. बहारदार सूत्रसंचालन प्रा. हर्षल पाटील यांनी केले. तर महासचिव खंडेराव कड यांनी आभार मानले.

यावेळी पुणे भूजलचे सह संचालक हनुमंत राव ढोबळे, संघटनेचे अध्यक्ष दिगंबर मणियार, पदाधिकारी सुभाष सूर्यवंशी, मनोहर कार्लेकर, रवींद्र सेवेकर, यांनी मनोगतात सांगितले की. ना. गुलाबराव पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितही कर्मचाऱ्यांच्या हिताचे घेतलेल्या निर्णयाचे महत्व विषद करून ऋण व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती !

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, भूजलचे सहसंचालक हनुमंतराव ढोबळे,संघटनेचे अध्यक्ष दिगंबर मणियार, कार्यध्यक्ष संजय खोकले , महासचिव खंडेराव कड, संघटक रविंद्र सेवेकर, सुभाष सूर्यवंशी , सेवा निवृत्त अभियंता डी.डी. इंगोले, ए.पी. झाल्टे , एस.बी.जाधव , नाना गुटले, आर.सी.मोरे , मनोहर कार्लेकर, भालचंद्र जावतकर, उदय सोळंखे, किरण गरुड, सुनील वाघमारे, लक्ष्मण अनल, संदीप म्हाळगे, अशोक चोपडे , श्री चिद्रवार , तालुका प्रमुख शिवराज पाटील, महानगर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, दिलीप पोकळे, आशुतोष पाटील यांच्यासह राज्यातील विविध भागातून आलेले अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम !

कार्यक्रम यशस्वीतेसाठी उप अभियंता सुभाष सूर्यवंशी , वाय. जी.पाटील, सत्तार शेख , अतुल कापडे, कार्याध्यक्ष संजय खोकले, विष्णू बडगुजर , सतीश महाजन , आर. एस. झटकर, आर.पी. देशमुख व हात पंप / वीजपंप दुरुस्ती कर्मचारी संघटनेचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonWater Supply Minister Gulabrao Patil was felicitated in the gratitude ceremony!

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

स्व. कांताई जैन यांच्या १९ व्या स्मृतिदिनी ५०७ सहकाऱ्यांनी केले रक्तदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात धाडसी घरफोडी ; अडीच लाखांचा ऐवज लंपास !

September 30, 2021

जळगावात तरुणाची निर्घृण हत्या, दगडाने ठेचले डोके ; दोन संशयित ताब्यात !

May 25, 2022

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर

October 29, 2020

शिक्षक वक्ता, नेता व अभिनेता असावा ; प्रा. वा.ना. आंधळे याचं प्रतिपादन !

February 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group