जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गणेश कॉलनी भागातील एका बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
शहरातील गणेश कॉलनी भागात विजय कॉलनीला लागून असलेल्या एचडीएफसी बँकेचे एटीएम शस्त्राच्या सहाय्याने तोडफोड करून एकाने रक्कम पळविण्याचा प्रयत्न केला. परंतू तोडफोडीच्या आवाजाने परिसरातील नागरिक सतर्क झाले आणि त्यांनी घटनास्थळावरून संशयित चोराला ताब्यात स्वाधीन केले. जिल्हापेठ पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे