रावेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असतांना व्हिडीओ तयार करणाऱ्या तरुणाविरुद्ध सावदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी उर्फ सोनू संतोष तायडे, असे संशयित आरोपी तरुणाचे नाव आहे.
दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी तिच्या घरातील बाथरुममधे अंघोळ करत होती. यावेळी विकी हा पिडीतेच्या घराच्या बाथरुमवर चढून त्याच्या मोबाईलमधे अंघोळ करत असल्याचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला पकडण्यात आले. या प्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून विकी तायडे विरुद्ध सावदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे पुढील तपास करत असून संशयीत आरोपी तरुणास अटक करण्यात आली आहे.