धरणगाव (प्रतिनिधी) दिल्ली पोलीस ऑनलाईन परीक्षेमध्ये गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सचिन अशोक पाटील (वय ३२ वर्ष व्यवसाय नोकरी रा. चंदु अण्णा नगर, खोटे नगर, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष कुलदिप दहिया (रा. १६२ मोहम्मदाबाद ता. मोहम्मदाब द जिल्हा. सोनपत, हरियाणा) आणि दिपक जोगिदर सिंग (रा.८३१ वार्ड ७ दबरा १६४ हिसार ता. जि. हिसार, हरियाणा) हे दोघं जण दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल महिला/पुरुष भरती २०२३ साठी स्टाफ सिलेक्शन कमिशन वेस्टर्नरिझन, मुंबईद्वारे ऑनलाईन परीक्षा साई टेक्नाबाईट परिक्षा सेंटर पाळधी ता. धरणगाव येथे आले होते.
दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास आशिष दहिया आणि दिपक सिंग या दोघांनी ब्लुटुथव्दारे ऑनलाईन परीक्षेमध्ये गैरप्रकार करण्याच्या उद्देशानेकानात पिवळसर व वरच्या बाजूला काळा पटटा असलेला त्यावर J२२१०Micspy असे लिहिलेले ब्ल्युटयुथडिवाईस कानात ठेवून दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२३ साठी घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन परिक्षामध्ये गैरप्रकार करण्याच्या उददेशाने परिक्षा हॉलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतांना मिळून आलेत. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि सचिन शिरसाठ हे करीत आहेत.
















