TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बनावट सौदा पावत्या करून उद्योजकाची मिळकत हडपण्याचा प्रयत्न ; दोन वकिलांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा !

जळगाव जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल ; मागील तारखेचा स्टॅम्प विकत घेत बनावट स्वाक्षरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बनावट सौदा पावती करून मिळकत हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहरातील दोन वकिलांसह ११ जणांविरुद्ध जळगाव जिल्हापेठ पोलिसात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत मनोज लिलाधर वाणी (वय 41 धंदा शेती व व्यापार रा. 22, जिल्हा परिषद कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या परिचयाचे राजेश घनशाम पाटील (रा. गोकुळ बंगला, शिवरामनगर, चर्चचे समोर, जळगांव) यांना परिवारासह ओळखत होते. मनोज वाणी त्याची पत्नी कल्पना वाणी अशांनी राजेश पाटील यांना मृत्युपत्रान्वये मिळालेली व महसुल दप्तरी त्यांची मालकी असलेली तुकडी जिल्हा जळगाव पोट तुकड़ी तालुका जळगाव पैकी मौजे पिंप्राळा शिवारातील घर जागा व मजल्यावरील बांधीव घरजागा व तळमजल्यावरील सामाईक अविभाज्य व गच्ची मालकीहक्कासह सदरची मिळकत नोंदणीकृत खरेदी खतान्वये प्रत्येकी 30 लाख प्रत्येकी किंमत राजेश पाटील यांना अदा करून त्यांच्याकडून दि.3 ऑक्टोबर 2019 रोजी खरेदी होती. तसेच खरेदी खतानुसार मिळकत वाणी दाम्पत्याच्या ताब्यात आहे.

READ ALSO

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

त्याचप्रमाणे कै. घनशाम लक्ष्मण पाटील यांच्याकडुन भाडेतत्वाचा करारनामानुसार दि. 18 मार्च 2016 रोजी मेहरूण शिवारातील प्लॉट नं. 18 / 2 रामदास कॉलनी, येथे ऑफीससाठी जागा व्यावसायिक वापर करण्यासाठी 10 वर्षाकरीता दरमहा 10 हजार रुपये अशी भाडयाने घेतलेली आहे. वरील मिळकती हया राजेश घनशाम पाटील यांचे मयत वडिल कै. घनशाम लक्ष्मण पाटील यांचा स्वकमायची मिळकती होत्या व त्यांनी मृत्युपत्रानुसार दिनांक 14/ जुलै 2003 अन्वये रोजी राजेश घनशाम पाटील यांना नोदणीकृत करून दिलेल्या होत्या. कै. घनशाम पाटील यांच्या मृत्युनंतर सदरच्या मिळकतीवर नाव लावण्यासाठी राजेश घनशाम पाटील यांनी केलेल्या अर्ज व शपथपत्राप्रमाणे महसुल दप्तरी मालक सदरी त्यांचे नावाची नोंद झाली आहे. सदरची नोंद झाल्यानंतर राजेश घनशाम पाटील यांनी मला व माझ्या पत्नीला नोंदणीकृत खरेदीखत करून दिलेले आहे. सदर राजेश पाटील हे उच्च शिक्षीत व बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे जळगाव शहरामध्ये जमिनी खरेदी विद्रीचा व्यवसाय सुमारे 30 ते 40 वर्षापासून करीत आहे.

दिनांक 2 नोव्हेबर 2022 रोजी दोन वर्तमानपत्रामधील जाहीर नोटीसीव्दारे मला समजले की, माझे मालकीचे रहाते घर व मी माझे व्यवसायासाठी रामदास कॉलनी 18/2, जळगाव येथील भाडेतत्वावर घेतलेली इमारतीमधील तळमजलेवरील मिळकती बनावट सौदेपावत्या या 1] राजेश घनशाम पाटील यांनी त्यांचे सहकारी 2 ] जितेंद्र बाबुराव देशमुख (रा. पाटीलवाडा, आसोदा ह. मु. अयोध्या प्रोव्हीजन जवळ, अयोध्या नगर, जळगाव), 3] मिलींद नारायण सोनवणे (रा. 7 नुतनवर्षा कॉलनी, महाबळ जळगाव), 4] जगदीशचंद्र पुंडलिक पाटील (रा. गुरु माउली श्रीराम समर्थ कॉलनी, गट नं. 327 प्लॉट नं.5 खोटेनगर स्टॉपजवळ), 5] सुजाता राजेश पाटील (रा. गोकुळ बंगला, शिवरामनगर, चर्चचे समोर, जळगाव), 6] विनिता संजय पाटील (रा. वेद गिरणार महाविद्यापीठ 21 के. एम. कनकपुरा रोड, आर्ट ऑफ लिव्हि ंग आश्रम, उदयपुरा बंगलौर), 7 ] लिना रणजित बंड (रा. बंड ऍन्ड स्पॉ मारोती शोर म, अमरावती), 8] अनिता नितीन चिंचोले (रा. प्लॉट नं. 132, आर्दशनगर, जळगाव), 9]ऍड. सतिश बी. चव्हाण (रा.रामबाग कॉलनी, आयएमआर कॉलेजसमोर, जळगाव), 10]ऍड. सुरेखा डी. पाटील (रा. जळगाव ऑफीस उत्कर्ष प्लॉझा ख्वाजामिया चौक, प्रोग्रेसिव्ह स्कुलसमोर, जळगाव) यांनी आपआपसांत संगनमत करून कटकारस्थान करत मयत कै. घनशाम लक्ष्मण पाटील व हिराबाई लक्ष्मण पाटील यांच्या सोबत त्यांचा दिनांक 3 जानेवारी 2017 रोजी लेखी सौदा पावती करारनामा झाला आहे व सदरचा करारनामा हा रक्कम 45 लाख रुपयाचा झालेला असून त्यापोटी त्यांनी लिहून देणार यांना रक्कम 45 लाख रोख वेळोवेळी रोख अदा केले आहे, अशी सौदा पावतीत नमुद केले आहे.

तसेच माझे घर प्लॉट नं. 10 गट नं.44 मधील सि. स.नं. 7821 या मिळकतीची सौदा पावती लिहून घेणार जितेंद्र बाबुराव देशमुख, मिलींद नारायण सोनवणे, जगदीशचंद्र पुंडलिक पाटील यांच्या सहया असून सौदा पावतीस साक्षीदार म्हणुन मयत कै. घनशाम लक्ष्मण पाटील यांच्या विवाहीत मुली विनिता पाटील , लिना बंड, अनिता चिंचोले, व सुन सुजाता पाटील यांच्या सहया आहेत. सदरची सौदा पावती ही ऍड. सुरेखा डी. पाटील यांनी करून दिलेली असून ती सौदापावती ही ऍड. संतोष बी चव्हाण यांच्याकडून दि. 10 एप्रिल 2017 रोजी नोटरी केलेली असल्याचा शिक्का आहे.

मुळात सदरहू हिराबाई घनशाम पाटील यांच्या नावावर गट नं. 44 पिंप्राळा शिवार सि.स.7821 व सर्व्हे नं. 494, प्लॉट नं.18 मेहरूण शिवार नव्हत्या व नाही. त्यामुळे सदरच्या मिळकती संदर्भात सौदापावती करण्याचा हिराबाई घनशाम पाटील यांना कोणताही हक्क किंवा अधिकार नाही, असे असतांना सौदा पावतीवर हिराबाई पाटील यांना लिहुन देणार दाखविलेले आहे. परंतु सदरचे सौदा पावती पाहता असे दिसून आले की, सौदा पावती करतांना वापरण्यात आलेला स्टॅम्प हा दिनांक 07 ऑक्टोबर 2017 रोजी मिलींद नारायण सोनवणे यांनी करारनामा म्हणुन विकत घेतलेला आहे व सदर स्टॅम्पचा सौदा पावतीसाठी विकत घेतल्याचा उल्लेख नाही. यावरून हे स्पष्ट होते की, दिनांक 3 जानेवारी 2017 रोजी कोणतीही सौदा पावती कै. घनशाम पाटील यांचे सोबत झालेली नाही. सदरचा सौदा पावतीचा करारनामा वरील कै.घनशाम पाटील यांची मुळ सही व सौदे पावतीवरील सही यामध्ये देखील तफावत आहे.

तसेच विनोद पंजाबराव देशमुख यांनी माझे ताब्यात असलेली व सध्या गोदावरी लक्ष्मी को आप बँक लिमीटेड यांचे ताब्यात असलेली इमारत भाडे करारनामाचे इमारतीची सुध्दा कै. घनशाम लक्ष्मण पाटील व हिराबाई घनशाम पाटील यांचेकडून मेहरुण शिवारातील प्लॉट नं. 18 सर्व्हे नं. 494, सि.स.नं.200 यांचे क्षेत्रफळ 501.50 चौ.मी.ची सौदा पावती दिनांक 03/01/2017 रोजी जळगाव येथे केलेली आहे असे नमुद केले आहे. तसेच सदरचे सौदा पावतीमध्ये मिलींद सोनवणे हे लिहुन घेणार, लिहुन देणार, किंवा साक्षीदार नसतांना देखील त्यांचे नावाने स्टॅम्प विकत घेण्याचे काहीएक कारण नाही. मुळात सदरचा स्टॅम्प दि. 07 जानेवारी 2017 रोजी करारनामासाठी घेतलेला असतांना त्या स्टॅम्पवर दिनांक 3 जानेवारी 2017 रोजी सौदापावती कशी काय करण्यात आली, असा प्रश्न फिर्यादीत मनोज वाणी यांनी उपस्थित केला आहे. तसेच सदरची सौदापावती ही दि. 6 एप्रिल 2017 रोजी नोटरी करण्यात आलेली दिसते. तसेच सदरच्या सौदापावतीमध्ये नमुद केल्याप्रमाणे मयत कै.घनशाम लक्ष्मण पाटील यांनी त्यांचा दिनांक 14 जुलै 2003 रोजीचे मृत्युपत्रामध्ये कोणतीही अट टाकलेली नव्हती. त्यामुळे सर्व संशयित आरोपींनी संगनमत करून कटकारस्थान करत रितसर नोंदणीकृत खरेदीखतान्वये विकत घेतलेली मिळकत हडप करता यावी, यासाठी मागील तारखेचा स्टॅम्प विकत घेत त्यावर मयत कै. घनशाम लक्ष्मण पाटील यांच्या खोट्या सहया करून खोटी रक्कम दिल्याचे नमुद करत दोन्ही सौदा पावत्या खोटया व बनावट करत माझी फसवणुक केली असल्याचेही मनोज वाणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025
एरंडोल

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

June 20, 2025
गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
गुन्हे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

June 19, 2025
गुन्हे

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

June 19, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025
Next Post

धरणगावचे पी.डी.पाटील सर महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात महिलेच्या पर्समधून सोन्याचे ब्रासलेट लांबवले !

July 31, 2023

साकेगावात वीज कोसळली ; तरुणी ठार !

September 25, 2023

जळगावात हॉटेलमध्ये तरुणाला बेदम मारहाण ; मोहाडी फाट्यावरील घटना !

September 23, 2022

संतोष देशमुख हत्या प्रकरण : सरपंचांच्या संरक्षणाची धरणगाव तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

January 4, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group