चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील उंबरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश करपे यांनी ग्रामविकास मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन व चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे ना.गिरीषभाऊ महाजन यांनी भाजपाचा रुमाल गळ्यात टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले.
चाळीसगाव तालुक्यातील शाहू महाराज मराठा समाज विकास मंडळाचे कार्याध्यक्ष असून गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. चाळीसगाव मतदारसंघात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून सुरु असलेले विकासात्मक कामे तसेच त्यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याने प्रभावित होत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याचे अविनाश करपे यांनी सांगितले.