भोपाळ (वृत्तसंस्था) एका व्यक्तीच्या सहकाऱ्याने त्याच्या गुप्तांगात हवा भरली. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा धक्काच बसला. या व्यक्तीचं आतडं फुटलं. त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना सर्जरी करावी लागली. मध्य प्रदेशच्या उज्जैनमधली ही धक्कादायक घटना आहे.
आगर रोडमधील ग्राम बांदकामध्ये कुरकुरे बनवण्याचा एक कारखाना आहे. इथं उज्जैनमधील कमल सिंह राजपूत आणि पान बिहारमधील भर चौहान काम करतात. १६ फेब्रुवारीला ते दोघं एकत्र काम करत होते. त्यावेळी भरतने कमलच्या गुप्तांगात कम्प्रेसरने हवा भरली. त्यावेळी कमलला काही झालं नाही पण काही वेळाने त्याची प्रकृती बिघडली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा धक्काच बसला. त्याचं आतडं फुटलं होतं. त्यानंतर त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. सर्जरी करून त्याचा जीव वाचवण्यात आला.
याबाबत कारखाना प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कुरकुरे जास्त कालावधीपर्यंत पाकिटात सुरक्षित राहावेत यासाठी त्यामध्ये गॅस भरलं जातं. यासाठी कम्प्रेसरचा वापर होतो. दोन्ही कर्मचारी तीन दिवस कारखान्यात आले नाही, त्यावेळी या घटनेबाबत माहिती मिळाली. प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पण त्यामध्ये १० दिवसांची रेकॉर्डिंग स्टोअर होते. त्यामुळे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाहीत. पोलिसांनी जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा नोंदवला. आरोपीला कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.