नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालच्या कटवा येथील सर्कस मैदान परिसरातील ही हैराण करणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी युवकाने लग्नास नकार दिल्याने युवतीने आधी त्याच्या गालावर Kiss केली आणि त्यानंतर त्याला शटर गननं गोळी मारली. घटनेची माहिती मिळताच कटवा ठाण्यातील पोलीस तिथे पोहचले त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या लालचंदला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, बगान पाडा येथील मनिषा खातून कटवाच्या केसिया माठपाडा येथील रहिवासी लाल चंद्र शेखसोबत जवळपास ३ वर्षापासून प्रेमसंबंध होते. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने प्रियकर लालचंद लग्नासाठी तयार झाला नाही. त्यावरुन दोघांमध्ये वाद सुरू झाला. लालचंदने सांगितले की, त्याच्या प्रेयसीचे अन्य कुणासोबत संबंध सुरु होते. परंतु ती त्यास नकार देत होती. त्यानंतर प्रेयसी १ वर्षापूर्वी कटवा सोडून निघून गेली. आता ती झारखंडमध्ये राहत होती. परंतु मागील मंगळवारी रात्री ती झारखंडहून कटवा येथे परतली. प्रेयसी मनिषाने सर्कस मैदानच्या एका गल्लीत मला भेटण्यासाठी बोलावलं होतं. तिने आधीच प्लॅन केला होता. गोळी प्रियकराच्या जॅकेटला लागून निसटली. लालचंद या हल्ल्यात थोडक्यात बचावला. मात्र या घटनेनंतर प्रेयसी फरार झाली.
गोळीचा आवाज ऐकून परिसरातील लोकं हैराण झाले. घटनेची माहिती मिळताच कटवा ठाण्यातील पोलीस तिथे पोहचले त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या लालचंदला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. तर प्रेयसीच्या घरच्यांचा दावा आहे की, मनिषा तिच्या बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेऊ इच्छित नव्हती. तरीही लालचंद तिच्यावर दबाव टाकत होता. लालचंदकडेच बंदूक होती. ती त्याने स्वत:वर मारली. मात्र पोलीस आरोपी मनिषाचा शोध घेत आहेत. मनिषाला बंदूक कशी मिळाली? तिच्यासोबत आणखी कोणी होतं का? या सर्व बाबी पोलिसांकडून तपासल्या जात आहेत.
Excellent