जळगाव (प्रतिनिधी) डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांनी त्यांच्या लाखो अनुयायनसह बौद्ध धर्माचा स्वीकार करुन भारतात जी धम्मक्रान्ति केली त्यास आजपर्यंतच्या जागतिक इतिहासात तोड़ नाही , कोणत्याही शस्त्राचा वापर नाही , कोणतेही प्रलोभन नाही , कोणतीही साधी धमकी नाही की पैश्याची खैरात नाही निव्वळ एका आदेशावर लाखो लोक आपला हजारो वर्षाचा धर्म सोडून नवा धर्म स्वीकारतात या घटनेमुळे बाबासाहेबांनी जगात नवा इतिहास निर्माण केला असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.
जळगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात भाषण करतांना वाघ बोलत होते त्यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की भारतात उदयास आलेला , पाचशे वर्षे या देशाचा राजधर्म राहिलेला बौद्ध धर्म याच भारतातून हद्दपार झाला होता पण बाबासाहेबांनी त्यास पुनर्स्थापित केला व समस्त मानवास नवा संदेश दिला.
सुरवातिस प्रा हरिश्चंद्र सोनवणे यांनी कार्यक्रमाची माहिती विषद करुन बाबासाहेबांच्या संकल्पनेतील बौद्ध धर्म सांगितला व सर्वानि बुद्ध विचारांचे अनुसरण करावे यातच आपले कल्याण आहे असे सांगितले सर्वप्रथम बुद्धवंदना घेऊन बाबासाहेबांना वंदन करण्यात आले यादवराव बाविस्कार यांनी सूत्रसंचालन तर सुभाष सपकाले यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमास डी बी इंगले , भागवत पगारे , अभय सोनवणे , प्रा चंद्रमणि लभाने , सरोजिनी लभाने , रविन्द्र बाविस्कर , गोपाळ भालेराव , सुकदेव तायड़े , प्रकाश दाभाड़े , बाबूराव इंगले , नर्मदाबाई भालेराव , जीजाबाई दाभाड़े , मंगला सपकाले , नंदाबाई बोदोड़े , संघरत्न बाविस्कर आदिसह स्त्री पुरुष मोठ्या संखेने हजर होते कार्यक्रमाच्या अखेरिस सर्वानि धम्मचक्रदिन चिरायु हो च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या