गांधीनगर (वृत्तसंस्था) गुजरातमधील अहमदाबादमध्ये बजरंग दलानं भारताचं प्राचीन पुस्तक कामसूत्र जाळलं आहे. हे पुस्तक हिंदू देवी-देवतांना अश्लील रुपात दाखवलं असून त्यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप बजरंग दलानं केला आहे. दरम्यान, पुन्हा या पुस्तकाची विक्री केल्यास दुकानालाच आग लावू असं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
लॅटीट्युट नावाचं पुस्तकाचं दुकान अहमदाबादमधल्या एसजी महामार्गावर आहे. या दुकानाच्या बजरंग दलाचा स्थानिक संयोजक जवलित मेहता यानं कामसूत्र पुस्तकाची एक प्रत पेटवली. यावेळी तो म्हणाला की, या पुस्तकात कामसूत्राच्या नावाखाली हिंदू देवी-देवतांच्या फोटोंचा चुकीचा वापर करण्यात आला आहे. आम्ही हे पुस्तक दुकानाच्या बाहेरचं जाळलं. मात्र त्यानंतरही या पुस्तकाची विक्री सुरुच राहिली तर पुढच्या वेळी दुकानासोबत सर्व पुस्तकं जाळून टाकू.