नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातल्या नोएडामध्ये बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या लोकांनी गोंधळ केला. तसंच त्यांनी पोलिसांना मारहाण केल्याचा आरोपही त्यांच्यावर होत आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात साधारण ६० जणांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अपर पोलीस उपायुक्त रणविजय सिंह यांनी सांगितलं की, सदरपूर कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका युवतीवर बलात्कार करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात गुरुवारी सनी नामक एका आरोपीला अटक केली होती. या सनीला सोडवण्यासाठी बजरंग दलाचा नेता गंगा याच्या नेतृत्वाखाली ५०-६० लोक पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी तिथे गोंधळ घालण्यास सुरूवात केली. जेव्हा पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा या लोकांनी पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी गंगासह इतर ५०-६० अज्ञान युवकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.