धरणगाव (प्रतिनिधी) येथील बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयाचे इयत्ता ५ वी चे धनश्री कांतीलाल पाटील (k-१४५/२५५) कल्पेश नंदकिशोर जाधव (k-१५३/२५५), योगिता पुरुषोत्तम पाटील (k-२१३/२५५) हे शहरी सर्वसाधारण गटातून गुणवत्ता यादीत यशस्वी झाले आहेत.
इयत्ता आठवीमधून शहरी सर्वसाधारणमध्ये राधिका प्रमोद राजपूत (k-६५/२०९),सुमेध प्रमोद गाढे (k-१२३/२०९) गुण मिळवून गुणवत्ता यादीत चमकले. त्यांच्या यशाबद्दलसंस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटिया, उपाध्यक्ष अंकुश पाटील, सचिव प्रा.रमेश महाजन यांच्यासह सर्व संचालक मंडळ, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विक्रमादित्य पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील आणि सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गशिक्षकांनी मार्गदर्शन केले.
















