जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २२१ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर दुसरीकडे ६ रुग्णाने कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – ४३, जळगाव ग्रामीण-०४, भुसावळ-१०७, अमळनेर-००, चोपडा-३२, पाचोरा-०५, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-०५, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-०२, चाळीसगाव-१४, मुक्ताईनगर-०१, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०७ असे एकुण २२१ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४३ हजार ६०७ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार २६१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ७६७ रुग्ण सध्या उपचार घेताय.