धरणगाव (प्रतिनिधी) शहर ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा आणि शहर व परिसरातील गोरगरीब जनतेला सुविधा मिळाव्या यासाठी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाटील व मित्र परिवाराने साखळी उपोषण सुरु केले होते. आठवडाभरात वैद्यकीय मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे डॉ.मनोज पाटील यांनी आश्वासन दिल्यानंतर लक्ष्मण पाटील यांच्या उपोषणाची सांगता झाली.
धरणगाव ग्रामीण रुग्णालयात जवळपास एकही अद्ययावत सुविधांनी युक्त रुग्णालय नाही. त्यामुळे धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी दि. २० सप्टे, २०२२ पासून सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाटील व मित्र परिवाराने संविधानिक मार्गाने उपोषणास प्रारंभ केला होता. धरणगाव ग्रामीण रूग्णालय अंतर्गत ९६ गावे आहेत. त्यामधील जवळपास शहराची ५५ हजारांच्या लोकसंख्येला आरोग्याच्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामीण रुग्णालयावर आहे. त्यामुळे या रुग्णालयात वैद्यकीय मूलभूत सुविधा अत्यावश्यक आहेत. त्यामुळे धरणगाव येथे असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करावे, अशी मागणी लक्ष्मण पाटील यांनी करत साखळी उपोषण सुरु केले होते.
दि.२३ सप्टे, गुरुवार रोजी चोपडा उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील यांनी उपोषणस्थळी येवून उपोषणकर्त्यांच्या आरोग्य विषयक प्राथमिक मूलभूत सुविधा पूर्ण करण्याचे लेखी पत्र उपोषणकर्ते लक्ष्मण पाटील यांना दिले, तद्नंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते कैलास माळी, विनय पप्पू भावे, अरविंद देवरे, धिरेंद्र पुरभे, भीमराज पाटील यांच्या उपस्थितीत उसाचा रस देवून उपोषणाची सांगता झाली.
यावेळी सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, गटनेते कैलास माळी, जिवन आप्पा बयस, गोरख देशमुख, जितेंद्र पाटील, भिमराज धनगर, सूरज वाघरे, मयूर भामरे हे उपस्थित होते. तसेच शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आपल्या मतदार संघाचे आमदार तथा, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना सदर असलेले ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा संदर्भात कळवितो, असे प्रतापराव पाटील म्हणाले. या उपोषणाला शहर व परिसरातील विविध राजकीय, सामाजिक संघटना, पत्रकार, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, त्याचप्रमाणे सकल माळी समाज पंच मंडळ, पाटील समाज पंच मंडळ, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क, बहुजन क्रांती मोर्चा, जागृत जनमंच पदाधिकारी, व शहरातील असंख्य नागरिकांनी उपोषणस्थळी येवून अभिप्राय नोंदवून समर्थन दिले होते.