मुंबई (वृत्तसंस्था) फेसबुक हे असं माध्यम आहे ज्याने अवघ्या जगाला एकत्र आणलं आहे. दरम्यान, जगभरातील १५० कोटी फेसबुक यूजर्सचा डेटा चोरीला गेला असून, हॅकर्सनी त्याच्यातून कोट्यवधी रुपये कमावल्याचा संशय आहे. त्यामुळे फेसबुकवर बिनधास्त वावरत असाल आणि अकाउंट सुरू करून निश्चित असाल, तर सावध व्हा.
डेटा चोरी गेल्यास काय होऊ शकते?
“तुमच्या फेसबुक अकाउंटची सुरक्षाच धोक्यात येऊ शकते. या डेटाच्या माध्यमातून हॅकर तुमचे अकाउंट रिसेट करू शकतो. “तुमचा पासवर्ड बदलू शकतो आणि कोणतीही पोस्ट तुमच्या फेसबुकवर वॉलवर टाकू शकतो. तुम्हाला ब्लॅकमेलही करू शकतो. त्यातून पैसेही उकळू शकतो.
तसेच हॅकर्स एखादा गेम, नवे फिचरची भूरळ यूजर्सना घालतात. त्यातील प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुमच्या फेसबुक अकाउंटमधील तुमची माहिती सहजरित्या हॅकर्सच्या हाती लागते.
कोणता डेटा झाला चोरी?
१. तुमचे नाव
२. फोन नंबर
३. इमेल आयडी
४. यूजर आयडी
५. तुम्ही राहता तो भाग कोणता
६. महिला/पुरुष