मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या (Corona) डेल्टा व्हेरिएंटनंतर आता ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचा धोका देशभरात वाढला आहे. कोरोनाच्या वेगवेगळ्या रुपानंतर ओमिक्रॉमनने पालकांची चिंता वाढवली आहे. यामुळे काही देशांमध्ये लहान मुलांना लस देत आहे. देशात नुकतेच १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यातच आता लहान मुलांमध्ये सापडणारी ओमिक्राॅनची लक्षणं समोर आली आहेत.
आजकाल आपण कोरोना पॉझिटिव्ह लोकांमध्ये ताप, घसा खवखवणे आणि खोकला यासारखी लक्षणं दिसून येत आहे. तर तरुण आणि लहान मुलांमध्ये कोरोनाची प्रकरणे सतत वाढत आहेत. तरुण आणि लहान मुलांमध्ये यापैकी बहुतेक लोकांमध्ये ओमिक्राॅनची अतिशय सौम्य लक्षणे आहेत. ताप, खोकला, घसा खवखवणे आणि घसा दुखणे यांसारखी लक्षणे मुलांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहेत.
संसर्ग झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज विकसित होतात, ज्यामुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. मुलांना संसर्ग होण्याचा सतत धोका असतो, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. आतापर्यंत मुलांमध्ये इम्युनिटी जास्त असल्यानं कोरोनाचा प्रभाव खूपच कमी असल्याचं दिसून आलं आहे. मात्र, कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना हा शरीरातील श्वसनमार्गाच्या संसर्गाशी संबंधित आहे. त्यामुळे वृद्धांवर याचा जास्त परिणाम होतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी टाळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लसीकरण करून घेणं ही देखील आपली जबाबदारी आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा वेगानं पसरतोय. मात्र, ओमिक्रॉन झालेल्या रूग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागण्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणांचं ओझं देखील हलकं झालं आहे.