जामनेर (प्रतिनिधी) जळगाव औरंगाबाद रोडवरील नेरी गावातील पुलावर सार्वजनिक जागी क्रुझर गाडी अडवून गाडी चालकाला मारहाण करत सोने- चांदीचे दागिने चोरून पळ काढल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात आतिष तायडे याच्यासह तीन अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. १६ जून २०२२ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर पांडुरंग कोळी (वय ४९, रा. प्लॉट नं. १० हरिओम नगर आसोदा रोड) हे त्यांच्या नातेवाईकांसोबत त्यांच्या मालकीची क्रुझर गाडी क्रमांक ₹एमएच १९ सीएम ११७३) ने जात असताना साईट देण्याच्या कारणावरून आतिष तायडे याच्यासह तीन अनोळखी इसम यांनी त्यांच्या ताब्यातील (एमएच ४३ ए २०२२ ) पांढऱ्या रंगाची कॉलीस गाडीही ज्ञानेश्वर कोळी यांच्या गाडी पुढे लावली. तसेच ज्ञानेश्वर कोळी व साक्षीदार यांना आतिष तायडे यांच्यासह तीन अनोळखी इसम यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. यानंतर गळ्यातील, कानातील सोन्याचे दागिने जबरीने काढून पळून गेले. याप्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात आतिष तायडे याच्यासह तीन अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक मोहिते हे करीत आहेत.