TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

40 वर्षं मुलगा बनून घरात राहिला आणि दोन कोटींची जमीन विकली ; न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा

The Clear News Desk by The Clear News Desk
April 12, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बिहारच्या नालंदा जिल्ह्यात 40हून अधिक वर्ष एक माणूस घरातला मुलगा बनून राहत होता. संपत्ती आणि वारशाच्या या 40 वर्षांच्या लढतीत न्यायालयाचा निर्णय आला आहे. याप्रकरणी कुटुंबाला फसवणाऱ्या थंड डोक्याच्या गुन्हेगाराला केवळ तीन वर्षांची शिक्षा झाली आहे. नालंदा जिल्ह्याच्या अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारी मानवेंद्र मिश्र यांनी शिक्षा ठोठावली. 16 व्या वर्षी बेपत्ता झालेल्या मुलाच्या जागी घरात प्रवेश करत 41 वर्ष घरात राहून दयानंद गोसाईला फसवणुकीसाठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नालंदा जिल्ह्यातल्या सिलाव थाना परिसरातल्या मोरगाव इथली ही घटना आहे. गावातल्या दीडशे बिघा जमिनीचे मालक दिवंगत कामेश्वर सिंह यांच्या संपत्तीशी निगडीत हे प्रकरण आहे. कामेश्वर सिंह यांच्या आयुष्यात दुख:द क्षण आला. त्यांचा एकुलता एक मुलगा कन्हैया सिंह मॅट्रिकच्या वर्षादरम्यान बेपत्ता झाला. वर्ष होतं 1977. मुलाचा खूप शोध घेण्यात आला. सिलाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकुलता एक मुलगा बेपत्ता होऊन चार वर्ष उलटली होती. 1981 मध्ये शेजारच्या गावात साधू म्हणून एक तरुण आला. स्थानिकांच्या मते, हा साधू ‘मीच तो बेपत्ता कन्हैया’ असं सांगत होता. हे तो सातत्याने सांगत राहिला.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

ही गोष्ट सगळीकडे पसरली. कन्हैयाचे वडील कामेश्वर सिंह त्यावेळी हयात होते. हा साधू आणि काही अन्य लोकांच्या म्हणण्यावर कामेश्वर यांनी विश्वास ठेवला. यातूनच त्याला ते घरी घेऊन गेले. पण कामेश्वर यांच्या पत्नी रामसखी देवी यांनी या मुलाला मुलगा मानण्यास नकार दिला. त्यांनी कधीच या साधूला मुलगा मानलं नाही. दयानंद गोसाई एकमेव वारस कन्हैया सिंह बनून घरात राहू लागला. पण रामसखी देवी यांनी या साधूला कधीच कन्हैया मानलं नाही. त्यांनी नेहमीच अविश्वास राखला. नोव्हेंबर 1981 मध्ये अखेरीस त्यांनी दयानंदविरुद्ध सिलाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला. नोव्हेंबर 1991 मध्ये पाटणा जिल्हा न्यायालयात मालकी हक्काचा दावा दाखल करण्यात आला. 1995 मध्ये कामेश्वर आणि त्यांची पत्नी रामसखी देवी यांचं निधन झालं.

आईच्या मृत्यूनंतर मुलीने सांभाळली आघाडी

आईवडिलांच्या मृत्यूनंतर पुढची लढाई गुम कन्हैया सिंह यांची बहीण विद्या देवी यांनी लढली. याबाबत त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे वकील राजेश कुमार यांच्या मते हे सगळं जमीन आणि संपत्ती हडपण्यासाठीच करण्यात आलं. राजेश कुमार यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितलं की, कामेश्वर सिंह यांच्या घरी जवळपास 40 वर्ष राहताना दयानंदने 50 ते 55 बिघा जमीन विकली. पाईपलाईन उभारण्यासाठी त्याला नुकसानभरपाईही मिळाली. त्याने लग्नही केलं. कन्हैयाच्या आईने खटला दाखल केला होता. आईने सांगितलं होतं की, कन्हैयाच्या डोक्यावर जखमेची खूण होती. दयानंदच्या डोक्यावर तशी कोणतीही खूण नव्हती. डीएनए टेस्टसाठी तो तयार झाला नाही.

खोटं प्रमाणपत्र

दयानंद जमुई जिल्ह्यातील ज्या गावचा होता त्या गावातील एका माणसाने सांगितलं की, हा प्रभू देसाईंचा तिसरा मुलगा आहे. या सगळ्याप्रकरणी चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे न्यायालयात दाखल करण्यात आलेलं दयानंद गोसाई यांचं मृत्यूचं प्रमाणपत्र. प्रमाणपत्रानुसार दयानंद गोसाईंचा मृत्यू 1981 लिहिण्यात आला. पण हे प्रमाणपत्र 2014 मध्ये रद्द करण्यात आलं. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रमाणपत्राची शहानिशा तपासण्यात आली. ते नकली निघालं. जिल्हा न्यायालयातून हे प्रकरण पटणा उच्च न्यायालयात गेलं आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नव्याने सुनावणी झाली.

तीन वर्ष कारावासाची शिक्षा

नालंदा जिल्हा न्यायालयाने दयानंद गोसाईंना तीन वर्षांच्या कारावासाची आणि दंडाची शिक्षा ठोठावली. नालंदा जिल्हा अभियोजन राजेश कुमार पाठक सांगतात, 2014 पासूनच आरोपीची डीएनए टेस्ट करावी अशी मागणी करण्यात येत होती. 2022 न्यायालयाला लेखी आवेदन देऊन टेस्ट करायला नकार देण्यात आला. 1977 ते 1981 या कालावधीत कुठे होतो हे आरोपीला सांगता आलेलं नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर दयानंद गोसाई यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, हे सगळं संपत्तीसाठी केलं जात आहे. बहिणींची नजर संपत्तीवर आहे. त्यासाठी हे करण्यात आलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

बायकोला एका रात्रीसाठी पाठव ; बॉसची मागणी ऐकताच कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत तेजी ; चेक करा सोन्या चांदीचे लेटेस्ट दर

May 30, 2022

चिमुरडीला न्याय द्या – अन्यथा बहुजन क्रांती बांधवांतर्फे आंदोलनाचा इशारा

October 22, 2020

‘२०१४ पासून भारत अमेरिकेचा गुलाम’ ; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

November 23, 2021

रोटरी क्लब ऑफ जळगावतर्फे देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा !

August 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group