TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून डॉ.उत्तमराव महाजन प्रबळ दावेदार !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2024
in चाळीसगाव, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली असताना भाजपाने विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांची तिकीट कापून स्मिता वाघ यांना संधी दिली आहे तर दुसरीकडे शिवसेना (उबाठा)कडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. पक्षाकडून काही दिवसांपूर्वी संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने जिल्हा परीषदेचे माजी सदस्य व केडीएम ग्रुपचे अध्यक्ष नानासाहेब डॉ. उत्तमराव धनाजी महाजन यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे शिवाय डॉ.महाजन हेच महाविकास आघाडीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मतदारसंघात त्यांच्याच नावाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

शैक्षणिक क्रांतीतून घडवले अनेकांचे जीवन
2014 मध्ये पाचोरा विधानसभा निवडणुकीत डॉ.महाजन यांनी भाजपकडून उमेदवारीदेखील केली होती. नानासाहेबांनी वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा दिल्या नंतर सर्वप्रथम किसान ज्ञानोदय मंडळ गुढे संचलित होमोओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय शिरपूर व चाळीसगाव येथे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. गेल्या 35 वर्षांच्या काळात या संस्थेच्या अनेक शाखा त्यांनी सुरू केल्या आहेत. यात बी.फार्मसी, डीफार्मसी, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, अध्यापक विद्यालय, नर्सिंग कॉलेज, इंग्लिश स्कुल यासह अनेक शाखांचा समावेश आहे. या सर्व समूहात परिसरातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या परिसरातील ग्रामीण भागातल्या तळागाळापर्यंत शैक्षणिक गंगोत्री पोहचण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पूर्णत्वास नेले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खान्देशात त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.या परिसरातील शहरी व ग्रामीण जनतेच्या आशा- आकांक्षाचे प्रतिक बनलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक व सामाजिक प्रगती घडवून आणून अनेकांचे जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

READ ALSO

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

35 वर्षांपासून राजकीय क्षेत्रात सक्रिय
शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात योगदान देत असतांना गेल्या 35 वर्षांपासून राजकीय पक्षात ही ते सक्रीय आहेत. सुरुवातीला त्यांना गुढे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची संधी मिळाली. या कारकिर्दीत गुढे गावात लोकाभिमुख अनेक योजना त्यांनी मार्गी लावल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांपूर्वी गुढे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून नानासाहेबांच्या सहचारिणी सौ.कल्पनाताई उतमराव महाजन निवडून आल्या आहेत. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी धुरा सांभाळली आहे तसेच माळी समाजाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे. विद्यापीठाच्या अनेक समित्यांवर ते आहेत. या सर्व क्षेत्रामुळे नानासाहेबांचा जनसंपर्क अतिशय दांडगा असून जळगाव जिल्ह्यात त्यांची सर्वत्र ओळख आहे.

डॉ.महाजन प्रबळ उमेदवार
भाजपाने विद्यमान खासदारांचे तिकीट कापून जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ यांना संधी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झाला नसलातरी तुल्यबळ उमेदवार देण्यावर भर असल्याने चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीकडून अनेक उमेदवार इच्छूक असलेतरी सक्षम व सामाजिक मतांचा विचार करूनच उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. डॉ.महाजन हे उच्चशिक्षीत तर आहेतच शिक्षण सामाजिक, राजकीय क्षेत्रातील त्यांचे कर्तृत्व मोठे असल्याने महाविकास आघाडीकडून त्यांना निश्चित संधी मिळेल, असे जाणकारांना वाटते. येत्या एक वा दोन दिवसात महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याने याकडे राजकीय क्षेत्रातील धुरिणांसह मतदारांचे लक्ष लागले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
जळगाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

October 16, 2026
अमळनेर

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
Next Post

धरणगावनजीक भरधाव ट्रकच्या धडकेने प्रौढाचा मृत्यू ; एक जण गंभीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लाडके आई-आजोबा म्हणून वृद्धांना मदत करा – डॉ. अण्णासाहेब टेकाळे

March 23, 2025

जळगावातील बजरंग बोगद्याजवळ धावत्या रेल्वेच्या धडकेत ५ गायी जागीच ठार !

November 2, 2024

पिलखेडा शाळा आणि गावाच्या विकासासाठी कटिबद्ध ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही !

January 30, 2024

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 04 एप्रिल 2025

April 4, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group