धरणगाव (प्रतिनिधी) “प्रस्थापित समाजव्यवस्थेने बहुजन, दलित व अल्पसंख्याकांना नाकारलेले माणूसपण व अधिकार संविधानामुळेच मिळाले. म्हणूनच संविधानामुळेच बहुजन, दलित आणि अल्पसंख्यांकांना मानवी चेहरा प्राप्त झाला आहे,” असे प्रतिपादन संविधान संमेलनाचे संयोजक मुकुंद सपकाळे यांनी केले.
येथील संविधान संमेलन आयोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. अशोक पवार होते. प्रारंभी प्रास्ताविक प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी केले. संविधान संमेलनाची भूमिका डॉ. मिलिंद बागुल यांनी विशद केली.
या बैठकीत संविधान संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. करीम सालार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी खलील देशमुख, सुश्मिता भालेराव यांनी दिनांक २६ व २७ जुलै रोजी होणाऱ्या संविधान शिबिरासंदर्भात माहिती देत उपस्थितीचे आवाहन केले.
संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. करीम सालार, डॉ. एस.एस. राणे, सुरेश चांगरे, निखिल रांजनेकर, अजय बिऱ्हाडे, राजू सोनवणे, चेतन नन्नवरे, मनोहर गाढे, विकास बिऱ्हाडे, विलास सुरवाडे, डी.एच. निकुंभे, अॅड. राजेश गोयर, दयाराम पाटील, राजू सवरणे, भैय्या सपकाळे, अनिल सुरडकर, विजयकुमार मौर्य, सुनील सोनवणे, निलेश सोनवणे, दत्तू सोनवणे, अनिल सोनवणे, मंगल बी. पाटील, आधार सपकाळे, भारत सोनवणे यांनी विविध सूचना मांडल्या.
या बैठकीस संजय सोनवणे, महेंद्र केदारे, राजू सपकाळे, कैलास तायडे, प्रदीप सोनवणे, राजू मोरे, आनंदा तायडे, यशवंत घोडेस्वार, सुभाष साळुंखे, भीमराव तायडे, मुकुंदा इंगळे, पितांबर अहिरे, संजय बागुल, दिलीप सपकाळे, प्रा. के.एल. हिरोळे, ललित महिरे, अजय कोचुरे, चेतन तायडे यांची उपस्थिती होती.
संविधान पर गीत सादर करत कवी राहुल तायडे यांनी कार्यक्रमाला सुरुवात दिली. बैठकीचे संचलन बापूराव पानपाटील यांनी तर आभार प्रदर्शन जगदीश सपकाळे यांनी केले.