चोपडा (प्रतिनिधी) येथील तलाठी कार्यालयातील कोतवाल जितेंद्र एकनाथ धनगर यांना जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय उत्कृष्ट कोतवाल पुरस्कार नुकताच मिळाला आहे.
कोतवाल जितेंद्र धनगर यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते १ आगस्ट रोजी महसूल सप्ताहातील प्रथम दिवशी देण्यात आला. तसेच तालुकास्तरीय पुरस्कार उपविभागीय अधिकारी एकनाथ बंगाळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते मिळाला जितेंद्र धनगर यांना तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय असे दोघ पुरस्कार एकाच वेळी मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे, असे दोघ पुरस्कार मिळविणारे ते पहिले कोतवाल ठरले आहेत.
मा. जिल्हाधिकारी जळगाव, मा. पोलिस अधीक्षक जळगाव, मा अपर जिल्हाधिकारी जळगाव,यांचे हस्ते सन 2022-2023 सालातील जिल्हास्तरीय उत्कृष्ट कोतवाल व मा उपविभागीय अधिकारी चोपडा,मा.तहसीलदार चोपडा व मा अपर तहसीलदार चोपडा यांचे हस्ते सन 2022-203 सालातील तालुका स्तरीय उत्कृष्ट कोतवाल पुरस्कार स्विकारला आहे.