भडगाव (प्रतिनिधी) शहरातील बस स्थानकावरुन एका ३४ वर्षीय महिलेची पर्स लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बस स्थानकावरून दि.२३ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास स्वाती विजय पाटील (वय ३४) यांची पर्स त्यामधील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम अशी एकूण ४१ हजार ६५० रुपयाचा मुद्देमाल अनोळखी व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी महिलेने भडगाव पोलीस स्थानक गाठत अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.विलास पाटील हे करीत आहे.