भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केलीय. विकास सीताराम पाटील (वय ४८) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, विकास सीताराम पाटील याने दि.३ फेब्रुवारी रोजी अडीच वाजेच्या सुमारास घराजवळ खेळत असलेल्या एका सहा वर्षाच्या मुलीला घरात बोलवुन मी पैसे देतो, असे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. याबाबत पिडीत मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भादवि कलम ३४५,३७६,५११ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२, कलम ४,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करत संशयित आरोपीला अटक असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय नलावडे हे करत आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.