भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. गणेश संपत भिल (वय २९), असे संशयित आरोपीचे नाव आहे.
भडगाव तालुक्यातील एका गावात २८ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास महिला ही घरी एकटी असल्याचा फायदा घेत संशयित आरोपी गणेश भिल हा महिलेच्या घरात शिरला, त्यानंतर तिच्यासोबत अश्लिल चाळे करत असतांना महिलेने विरोध केला असता तिचे तोंडू दाबून मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर महिलेने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गणेश भिल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहे.