TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीज वितरणाची प्रलंबित कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करा – पालकमंत्र्यांचे निर्देश

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2020
in अर्थ, आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रब्बीचा हंगाम सुरु होत असल्याने या काळात शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा याकरीता मंजूर करण्यात आलेली कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करुन वेळेवर व पुरेशी वीज उपलब्ध करुन देण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिलेत.

येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील उर्जा विभागाच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार चिमणराव पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार श्रीमती लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता श्री. कुमठेकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, अधिक्षक अभियंता श्री. शेख, श्री. मानकर, धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंद ननावरे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

यावेळी पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील नागरीकांना व शेतकऱ्यांना वीजेचा सुरळीत पुरवठा व्हावा, याकरीता जिल्हा वार्षिक योजनेतून सन 2019-20 या आर्थिक वर्षात 16 कोटी 73 लक्ष निधीस प्रशासकीय मान्यता दिली असून 14 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. या निधीतून जिल्ह्यात 194 कामे सुरु आहे. तर अनेक कामे पूर्ण झाली आहे. प्रलंबित असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. विशेषत: जळगाव विमानतळ येथील विद्युत वाहिनी स्थलांतरीत करणे, आणि समांरत रस्ते तयार करण्यासाठी ट्रान्यफार्मर स्थलांतरीत करणे, नवीन वीजवाहिन्या व केबल टाकण्याच्या कामासाठी 7 कोटी रुपयांची तरतूर करण्यात आली आहे. ही कामे तातडीने पूर्ण करावी. तसेच शेतकऱ्यांना आवश्यक असलेले वीज कनेक्शन, तसेच शेतीला पाणी देण्यासाठी लागणारे ट्रान्सफॉर्मर वेळेत देण्याची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना दिल्यात. तसेच येत्या 12 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांच्यावेळी लोडशेंडीग होणार नाही याबाबात दक्ष राहण्याच्याही सुचना त्यांनी दिल्यात. त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे ऑईल खरेदीसाठी मागील वर्षी 75 लाख रुपयांचा निधी नाविन्यपूर्ण योजनेतून उपलब्ध करून दिला होता. यावर्षी कोविडमुळे निधी नसल्याने या खर्चासाठी सर्व आमदारांच्या निधीतून 1 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे सांगून स्वतःच्या निधीतून 20 लाख रूपये देत असल्याचे पालकमंत्री यांनी बैठकीत सांगितले.

जळगाव विद्युत मंडळ कार्यालयाचे विभाजन करण्याचा प्रस्ताव नव्याने सादर करावा, वीजेचा धक्का लागून मृत्यु झालेल्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना मदत देण्यात यावी, तसेच उपचार घेत असलेल्या कर्मचाऱ्याचा उपचाराच्या खर्चाची प्रतिपूर्ती मिळावी आदि विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला त्याचबरोबर जळगाव तालुक्यातील चिंचोली, मोहाडी, नशिराबाद, सुनसगाव, जामनेर तालुक्यातील देऊळगाव, वाकोद, पाळधी, तोंडापूर, मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, नायगाव व दुई, पाचारो तालुक्यातील सावखेडा, पारोळा तालुक्यातील बहादरपूरम, यावल तालुक्यातील साखळी, डांभूर्णी येथील उपकेंद्रांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात येऊन नव्याने 16 कामांचा नवीन डीएसआरप्रमाणे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सुचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी सर्व संबंधितांना दिल्यात.

यावेळी संबंधित आमदारांनी त्यांच्या मतदार संघातील वीज वितरणाशी संबंधित नवीन कामांचे प्रस्ताव, प्रलंबित कामे बैठकीत मांडली त्यावर तातडीने कार्यवाही करुन लोकप्रतिनिधींना अहवाल सादर करण्याच्या सुचनाही बैठकीत देण्यात आल्यात.

यावेळी जिल्ह्यातहील घरगुती, वाणिज्य, औद्योगिक व इतर 6 लाख 76 हजार 931 ग्राहकांकडे 3 हजार 594 कोटी 59 लक्ष 60 हजार रुपयांची थकबाकी आहे. यात कृषिसाठी 1 लाख 99 हजार 751 शेतकऱ्यांकडील 3 हजार 63 कोटी 72 लक्ष रुपयांच्या थकबाकीचा समावेश असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
Next Post

औट्रम घाट 11 ऑक्टोबर रोजी रहदारीसाठी बंद राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राम मंदिर जमीन व्यवहार पारदर्शक, समाजाला भ्रमित करण्याचे हे षडयंत्र : श्री राधे-राधे बाबा

June 16, 2021

शासनातर्फे विनामूल्य व्हॅक्सिनेशन करा, जनावरे मृत झाल्यास दहा हजाराची तात्काळ मदत द्या ; ना.गिरीश महाजन यांचे आदेश !

September 13, 2022

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 01 मार्च 2025

March 1, 2025

जळगाव रोटरी क्लब ऑफ इलाईटतर्फे ‘स्वयंसिद्धा’ शिबिर

October 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group