TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भांडूप आग प्रकरण : मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट, दोषींवर तत्काळ कारवाईचे निर्देश

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणीही केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली. तसेच या घटनेची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईज रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. तसेच, त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचं ठाकरे म्हणाले. तसेच या घटनेची चौकशी करण्यात येणार असून चौकशीत दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यात दिरंगाई, दुर्लक्ष झालं असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. तसेच कोरोनाच्या संसर्गामुळे आपण मॉल, सेंटर्समधील वर्दळीवर बंधनं आणली असल्याचंही ते म्हणाले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कोरोना संकटामुळे तात्काळ उपचारासाठी राज्यात रुग्णालये आणि कोविड सेंटर उभारण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याली हे मॉलमधलं हॉस्पिटल आहे. राज्यभर जिथे शक्य तिथे कोव्हिड हॉस्पिटल्सना परवानगी दिली होती. या हॉस्पिटलला तात्पुरती परवानगी होती. येत्या ३१ तारखेला संपत होती. दुर्दैवाने हॉस्पिटलच्या खाली असलेल्या दुकान, तळमजल्यांना आग लागली. ती हॉस्पिटलपर्यंत आली.

ज्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते, त्यातील काही जणांचा आतून बाहेर काढताना काहींचा मृत्यू झाला. अशा घटना झाल्यानंतर आपण जागे होतो, चौकशी होते. या प्रकरणातही चौकशी करुन कारवाई करु. कमला मिलमध्येही आग लागली होती. त्यावेळी अनेकांचे प्राण गेले होते. त्यामुळे अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून कोव्हिड सेंटर, जम्बो फॅसिलिटी सेंटरमधील स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिटच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कोविड सेंटर, रुग्णालये ज्या इमारतीत आहेत, त्या संपूर्ण इमारतीचंच फायर ऑडिट करण्याच्याही सूचना दिल्या आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

काय आहे घटना?

भांडूप पश्चिमेकडे असलेल्या ड्रीम मॉलला रात्री १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली होती. या मॉलमध्ये सनराईस रुग्णालय आहे त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती मॉलमधील रुग्णालयात पसरली. या रुग्णालयात ७६ रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मॉलच्या चारही बाजूला आग पसरल्याने अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

रश्मी शुक्ला अनेक आमदारांच्या संपर्कात : हसन मुश्रीफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुका ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज

January 14, 2021

ब्रेकिंग न्यूज : संजय राऊतांवर नाशिकमध्ये गुन्हा दाखल !

February 20, 2023

पाचोरा काँग्रेसच्या सोशल मीडिया विधानसभा अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड

July 2, 2021

कारवाईचा राग, चोपड्यात टोळक्याचा पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

December 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group