चाळीसगाव (प्रतिनिधी) जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आज चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथे शबरी आवास योजनेंतर्गत राज्यातील सर्वात मोठ्या घरकुल कॉलनीचे भूमिपूजन आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ.उज्वला संजय पाटील, पंचायत समिती गटविकास अधिकारी, नंदकुमार वाळेकर, सर्वोदय चे चेअरमन विकास तात्या पाटील, जेष्ठ नेते सुरेश तात्या सोनवणे, ह.भ.प. वसंतराव पाटील, रविआबा पाटील, अमोल चव्हाण, राजेंद्र महारु पाटील, रामचंद्र अण्णा पाटील, प्रवीणदादा पाटील, प्रशांतबापू पाटील, भाऊसाहेब जगताप, संजय संतोष पाटील, अविनाश करपे, गोकुळ पाटील, अतुल पाटील, संदीप पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील आजी माजी लोकप्रतिनिधी, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, आशा अंगणवाडी ताई, विद्यार्थी मित्र मैत्रिणी मोठया संख्येने उपस्थित होते.
राज्यात मॉडेल अश्या या घरकुल कॉलनीतील १८१ लाभार्थ्यांना एकूण २ कोटी ६० लाख अनुदान मिळणार असून आज पहिल्या टप्प्याचे २७ लाख अनुदान वितरण करण्यात आले. तसेच शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने उंबरखेड गावातील १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप देखील संपन्न झाले.
 
	    	
 














