TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भोसरी जमीन प्रकरण : सातबारा उताऱ्यानुसार ‘ती’ जमीन ‘एमआयडीसी’च्या मालकीची नाही ; विशेष न्यायालयाचे निरीक्षण !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2021
in कोर्ट, गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सातबाराच्या उताऱ्यानुसार भोसरी येथील जमीन ही एमआयडीसीच्या मालकीची नाही. तसेच मुद्रांक शुल्काची नोंदणी करतानाही जमीन कोणाच्या मालकीची आहे याची पडताळणी करण्याचा अधिकार उपनिबंधकांना नाही, असेही निरीक्षण विशेष न्यायालयाने उपनिबंधकाला जामीन देताना नोंदवलेले आहे.

सातबाराच्या कागदपत्रांनुसार भोसरी येथील जमीन ही एमआयडीसीच्या मालकीची वा संपादित केल्याचा पुरावा नाही. शिवाय जमीन खरेदीचे मुद्रांक शुल्कही योग्य प्रकारे आकारण्यात आले होते. त्यामुळे सरकारला कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आलेल्या कागदपत्रांवरून दिसत नाही, असे सकृत्दर्शनी निरीक्षण विशेष न्यायालयाने भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आणि पुणे हवेली येथील तत्कालिन उपनिबंधक रवींद्र मुळ्ये यांना जामीन मंजूर करताना नोंदवले आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) गुणवत्तेच्या आधारे जामीन देण्यात आलेले मुळ्ये हे पहिलेच आरोपी आहेत.

READ ALSO

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

सादर केलेले पुरावे लक्षात घेतले असता सातबाराच्या उताऱ्यातील नोंदीनुसार जमीन एमआयडीसीच्या मालकीची नाही. मुद्रांक शुल्काची नोंदणी करतानाही जमीन कोणाच्या मालकीची आहे याची पडताळणी करण्याचा अधिकार उपनिबंधकांना नाही. त्यामुळे त्यांनी एमआयडीसीकडून ना हरकत मागवण्याचा प्रश्न नाही. शिवाय, जमिनीच्या व्यवहाराबाबत बाजारमूल्यानुसारच मुद्रांक शुल्क आकारले गेले. त्यामुळे सरकारला कुठलेही नुकसान झालेले नसून मुळ्ये यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचाही पुरावा आलेला नसल्याचे सकृत्दर्शनी स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने त्यांना जामीन देताना नमूद केले आहे.

मुळ्ये यांना ४ ऑक्टोबरला सशर्त जामीन मंजूर केला होता

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यावर विशेष न्यायालयाने त्याची दखल घेत खडसे पती-पत्नी यांच्यासह मुळ्ये यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुळ्ये यांनी २७ सप्टेंबरला न्यायालयासमोर हजर होत अ‍ॅड्. मोहन टेकावडे आणि स्वाती टेकावडे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज गुणवत्तेच्या आधारे ऐकण्याचे स्पष्ट करत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तसेच ४ ऑक्टोबरला त्यांच्या जामीन अर्जावर निर्णय देताना त्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता.

न्यायालयाच्या तपशीलवार आदेशाची प्रत शुक्रवारी उपलब्ध झाली. संबंधित जमिनीचे बाजारभाव मूल्य हे २२.८३ कोटी रुपये होते याची जाणीव असतानाही मुळ्ये यांनी ३.७५ कोटी रुपयांच्या बाजार मूल्याचा उल्लेख करून व्यवहाराची नोंदणी केली. शिवाय, सातबाराच्या उताऱ्यातील अन्य रकान्यांतील एमआयडीसीच्या हक्कांकडे हेतुत: दुर्लक्ष केले व एमआयडीसीचे ना हरकत प्रमाणपत्र मागितले नाही. त्यांनी आरोपींना मदत करण्यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग केला व सरकारला नुकसान केल्याचा आरोप ईडीचा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
Next Post

'या' पेक्षा अधिक रकमेच्या वीज बिलासाठी आता द्यावा लागेल धनादेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. नितु पाटील यांना आएमए राष्ट्रीय अध्यक्ष उत्कृष्ट खेळ प्रतियोगीता पुरस्कार जाहीर !

December 26, 2023

भयंकर ! दुसऱ्या बॉयफ्रेंडचा फोन आल्याचा राग, बॉयफ्रेंडनं केला गर्लफ्रेंडचा खून

October 24, 2021

जिल्ह्यात आज आढळले ८७७ कोरोनाबाधित, ७२० झाले बरे !

May 8, 2021

राष्ट्रीय छात्र सेनेचा जन आंदोलन अभियानात सक्रिय सहभाग !

October 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group