जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहार प्रकरणात आज जळगावात न्यायालयात आज १०२ वर्ष वय असलेल्या एका ठेवीदाराने साक्ष नोंदवली. मुरलीधर रामचंद्र वाघ (रा. चांदवड) असं या वयोवृद्ध साक्षीदाराचे नाव आहे. दरम्यान, देशातील न्यायव्यवस्थेच्या इतिहासात सर्वात वयोवृद्ध साक्षीदार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहार प्रकरणात अमरावती, परभणी, लातुर, सांगली, लातुर व पुण्यात दाखल असलेल्या सात गुन्ह्यांमध्ये प्रमोद रायसोनी याच्यासह १४ संचालकांवर जिल्हा न्यायालयात कामकाज सुरु आहे. मागील काही दिवसांपासून साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. त्यानुसार आज आज १०२ वर्ष वय असलेल्या मुरलीधर रामचंद्र वाघ (रा. चांदवड) वयोवृद्ध साक्षीदाराची साक्ष सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांनी नोंदवून घेतली.
काय आहे मुरलीधर वाघ यांचा जबाब
मी मुरलीधर रामचंद्र वाघ, माझा शेतीचा व्यवसाय आहे. भाईचंद हिराचंद्र रायसोनी गल्टी स्टेट को. ऑप. क्रेडिट मोटी लि., शाखा चांदवड, नाशिक मला माहितीपत्रक व लोकांच्याकडून माहिती मिळाल्यामुळे व माझे नेहमीच्या जाणे येण्याच्या मार्गावर असल्याने मी नेहमी तेथे जात होतो. सदर सोसायटीमध्ये मुदत ठेव इतर ठेव्या दराचे जाहिराती बोर्ड लावण्यात आले होते. सदर जाहिरतीनुसार ग्राहक प्रत्येक ठेवीवर पैसे गुंतवणूक करीत होते. त्यामुळे मी सदर पतसंस्थेमध्ये संजिवनी ठेव योजनेत एक लाख, दोन लाख अशी एकूण तीन लाखाच्या ठेवी ठेवल्या होत्या.
वाघ बाबा या वयातही म्हणतात….स्टाफला ओळखू शकतो
सदरची रक्कम मी तेथे कॅश स्वरुपात काऊंटरवर भरली होती. त्यावेळी तेथे असलेल्या स्टाफला मी पाहिले तर ओळखू शकतो. दरम्यान, सदर मुदत ठेवीची मुदत संपल्यावर पैसे काढण्यासाठी गेलो असता मला तेथे पतसंस्था हि बंद झालेली दिसून आली. सदर पतसंस्थेची मुख्य शाखा जळगाव येथे फोन केला असता कोणीही फोन उचलत नव्हते.
या संचालकांवर केलाय आरोप
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., जळगावचे १) प्रमोद भाईचंद रामसोनी, २) दिलीप कांतीलाल चोरडिया, ३) मोतीलाल ओंकार जीरी ४) सुरजमल बघुतमल जैन ५) दादा रामचंद्र पाटील ६) भागवत संपत माळी ७) राजाराम काशिनाथ कोळी ८) वन हिरामण वाघ, ९) डॉ. हितेंद्र यशवंत महाजन १०) इंद्रकुमार आत्माराम ललवाणी ११) शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार, १२) सुकलाल शहाद माळी (३) यशवंत आकार जिरी १४) लिलाबाई राजाराम सोनवणे १५) प्रमिलाबाई मोतीलाल जिरी (६) मधुकर विष्णु सानप (मयत) असे सर्व संचालक यांनी माझी विश्वासाने संजिवनी ठेव योजनेत ठेवलेली एकूण रक्कम 1,00,000/- रुपये व व्याज परत न देवून सदर रकमेचा अपहार करून माझी फसवणूक केली आहे.
साक्षीदार म्हणून जबाब दिला तेव्हा वय होते ९८ वर्ष !
मुरलीधर वाघ यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे आपला जबाब दिला. त्यावेळी त्यांचे वय ९८ वर्ष होते. खटला सुरु झाल्यानंतर जेव्हा त्यांना प्रत्यक्ष न्यायालयात जबाब देण्यासाठी यावं लागले, त्यावेळी श्री. वाघ यांचे वय १०२ वर्ष झालेले होते. विशेष म्हणजे या वयातही त्यांनी न्यायालयासमोर व्यवस्थित जबाब नोंदवला. दुसरीकडे न्यायव्यवस्थेच्या इतिहासात सर्वात वयोवृद्ध साक्षीदार असण्याची शक्यता असल्याचे मत विधी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी व्यक्त केले आहे.
मुरलीधर वाघ यांनी आज न्या. आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात व्यवस्थित साक्ष दिली. अगदी आम्हाला आमचे पैसे परत मिळाले पाहिजे, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने देखील मोठ्या आत्मीयतेने त्यांना साक्ष ऐकून घेतली. मी माझ्या वकिलीच्या व्यवसायात इतका वयोवृद्ध साक्षीदाराचा जबाब पहिल्यांदा नोंदवला. खरं म्हणजे त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळाले पाहिजे, हा सरकारी पक्षाचा साक्ष घेण्यामागे प्रमुख हेतू आहे.
– अॅड. केतन ढाके (सरकारी वकील)