TheClearNews.Com
Friday, January 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘बीएचआर’ घोटाळा : वाढीव पोलीस कोठडीसाठी पोलिसांनी दिली तब्बल २१ कारणे !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 6, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आर्थिक घोटाळ्यात अटकेत असलेल्या संशयितांची पोलीस कोठडी वाढवून मिळण्यासाठी पोलिसांनी तब्बल २१ महत्वपूर्ण मुद्दे न्यायालयासमोर मांडले. त्यात प्रामुख्याने मोबाईल सीडीआरवरुन महावीर जैन, विवेक ठाकरे, सुजित बाणी, सतिश ठाकरे हे पाहिजे आरोपी अवसायक जितेंद्र कंडारेसह एकमेंकाच्या सतत संपर्कात होते. तसेच विवेक ठाकरे यांच्या घर झडतीमध्ये मिळालेल्या ठेवीदाराचे कोरेचेक व शंभर रुपये किंमतीचे कोरे स्टॅम्पपेपर व मूळ ठेव पावत्या याबाबत समाधानकारक खुलासा मिळाला नसल्याचा कारणाचा समावेश आहे.

पोलीस कोठडीची कारणे

READ ALSO

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

जुन्या वादातून झालेल्या चकमकीत तरुणावर चाकू हल्ला

१. घरझडती, ऑफिस झडती, बॅक लॉकर्स, व इतर आवश्यक त्या ठिकाणची झडती कार्यवाहीमध्ये मोठया प्रमाणावर मिळून आलेल्या दस्तऐवजाची पडताळणी काही प्रमाणात आली होती. तसेच  इतरही कागदपत्रांची पडताळणी करणे बाकी आहे.

२. संशयित महावीर जैनच्या कार्यालय झडतीमध्ये अवसायक जितेंद्र कंडारे यांच्याशी संबंधीत मिळून आलेल्या कागदपत्राविषयी महावीर जैन यांनी संयुक्तिक खुलासा केला नाही.

३.  सीए महावीर जैन यांनी ऑडिट सारखाचा महत्वाचा दस्त खोटा तयार करुन कंडारे यांना मदत केली आहे. त्यावरुन त्यांचे संगनमत सिध्द होत आहे. या ऑडिट रिपोर्ट बाबत त्यांच्याकडे अधिक विचारपूस करणे आवश्यक आहे.

 

४. कर्जदार व ठेवीदार यांची माहिती गैरकारभारासाठी पुरविणा-या कर्मचा-याबाबत अटक आरोपीकडे तपास करुन त्यांचा शोध घ्यायचा आहे.

५.  तत्कालीन स्थानिक गुन्हे  शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संबंधित मूळ पत्र महावीर जैन यांच्या कार्यालयात कसे आले?,  या बाबत त्यांनी संयुक्तिक माहिती दिली नाही. तसेच या प्रकारचे दस्त त्यांच्या कार्यालय झडतीमध्ये मिळून आलेले आहेत या सर्व दस्ताबाबत त्यांच्याकडे सखोल विचारपूस करुन पुढील तपास करावयाचा आहे.

६. ऑडिट रिपोर्टशी संबंधित नसणारा तक्रारदार अनवर अहमद अत्तार याचा तक्रारी अर्ज महावीर जैन यांच्या कार्यालयात कसे आले?, या बाबत त्यांनी संयुक्तिक माहिती दिली नाही. तसेच या प्रकारचे दस्त त्यांच्या कार्यालय झडतीमध्ये मिळून आलेले आहेत. या सर्व दस्ताबाबत त्यांच्याकडे सखोल विचारपूस करुन पुढील तपास करणे आहे. तसेच या तक्रारदाराप्रमाणे किती जणांचे कोरे स्टॅम्पपेपर जितेंद्र कंडारे यांनी महावीर जैन यांच्याकडे आणुन दिले आहेत व त्याचा कसा उपयोग केला आहे?, याबाबत सखोल चौकशी करुन कोरे स्टॅम्पपेपर जमा करणा-या व पुर्ण रक्कम न मिळालेल्या ठेवीदारांची माहिती घेवुन पुढील तपास करणे आहे.

७. लिलावाच्या मालमत्तेची मूल्यांकन वारंवार स्वतःच्या सोयीने जितेंद्र कंडारे यांना बदलून देणारे व्हॅल्युअर अविनाश सोनी यांच्या बाबत अधिक चौकशी करणे व बदलेल्या दस्ताची आरोपी सुजित वाणीकडे समक्ष चौकशी करुन पुढील तपास करणे आहे.

८.  अवसायक जितेंद्र कंडारे, सुनिल झंवर व अटकेतील संशयित महावीर जैन, यांनी किती कर्जदाराच्या फाईल एफडी वर्ग करुन निरंक केले आहेत. अशा कर्जदार व ठेवीदारांबाबत महावरी जैन व सुजित वाणी यांचेकडे चौकशी करुन सदर कर्जदार व ठेवीदारांचे जबाब नोंदवून पुढील तपास करणे आहे.

९. पारस ओसवाल यांच्या पतसंस्थे तील संशयास्पद भूमिकेबाबत सुजित वाणी यांचेकडे चौकशी करुन पुढील तपास करणे आहे.

१०.  विवेक ठाकरे यांनी ठेवीदारांना खरोखर किती पैसे मिळवून दिले याबाबत त्यांचेकडे सविस्तर चौकशी करुन, या ठेविदारांचे जबाब नोंदवून पुढील तपास करणे आहे.

११. तसेच ठाकरे यांचे घर झडतीमध्ये मिळालेल्या ठेवीदाराचे कोरे चेक व शंभर रुपये किंमतीचे कोरे स्टॅम्प पेपर व मूळ ठेव पावत्या या बाबत त्यांचा खुलासा समाधानकारक नसून त्याबाबत त्यांच्याकडून पुढील तपास करणे आहे.

 

१२. ठाकरे यांनी ठेवीदाराकडून पैसे परत मिळवून देण्याच्या नावाखाली फसवलेल्या ठेवीदारांची त्यांचेकडून माहिती घेवून ठेवीदारांकडे पैसे मिळाले अगर कसे या बाबत तपास करणे आहे.

१३. ठेवीदाराकडून घेतलेले पैसे ठाकरे यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत त्या बँक खात्याची माहिती प्राप्त करुन घेवून त्याबाबत त्यांच्याकडे समक्ष तपास करणे आहे.

१४. धरम सांखला यांनी स्वतःचे कर्जामध्ये त्यांच्याशी संबंधीत नसलेल्या ठेवीदारांच्या ठेवी विकत घेवून ठेवीदारांना पुर्ण रक्कम अदा केलेली नाही व यासंदर्भातील त्याची सर्व कागदपत्रे अद्यापपर्यंत मिळुन आलेली नाही. त्याबाबत तपास करणे आहे तसेच त्या ठेवी स्वतःच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग केले आहे. त्याबाबत अशा ठेवीदारांची त्यांच्याकडून माहिती घेवून पुढील तपास करणे आहे. तसचे या कामासाठी त्यांनी मदत करणारे एजंटबाबत यांचेकडे सखोल विचारपूस करुन एजंटची नावे निष्पन्न करुन त्यांचा शोध घेवून पुढील तपास करणे आहे.

१५. धरम सांखला यांनी आयकर विवरण भरताना दिलेल्या माहिती बाबत त्याच्याकडे सखोल विचारपूस करुन पुढील तपास करणे आहे.

 

१६. धरम सांखला हे पतसंस्थेचे अंतर्गत लेखापरिक्षण व टैंक्स ऑडिटर असल्याचे त्यांनी त्यांच्या जबाबात नमूद केले आहे. ते सी ए असल्यामुळे त्यांना पतसंस्थेच्या प्रत्येक खात्याची माहिती आहे. परंतु त्यांनी बेनामी ठेवीदार व कर्जदार यांची याबाबत तपासामध्ये समाधानकारक माहिती दिली नाही त्याबाबत त्याच्याकडे चौकशी करणे आहे.

१७. अटक आरोपी कमलाकर कोळी हा सतत मुख्य आरोपी जितेंद्र कंडारे यांचे सोबत राहत होता. त्यामुळे त्यास कंडारे यांच्या प्रत्येक हालचालीयावत माहिती आहे. त्यामुळे याचेकडून कंडारे यांच्या इतर आरोपींशी झालेल्या भेटी व त्यांनी आखलेले गुप्त कट याबाबत त्यास पूर्णपणे माहिती असूनही त्याने पाहिजे आरोपीचा शोध घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त माहिती दिली नाही. ही माहिती त्याचेकडून जाणून घेवून त्यादृष्टीने पुढील तपास करणे आहे.

१८. कमलाकर कोळी हा इतर पाहिजे आरोपी पैकी प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनिल झवर यांना ओळखत असल्याचे त्यांने तपासामध्ये सांगितले आहे. परंतु त्याच्या ठावठिकाण्याबाबत तो संयुक्तिक माहिती देत नाही. त्याबाबत त्याचेकडे सखोल चौकशी करुन पुढील तपास करणे आहे.

१९. अटक आरोपी सुजित वाणी यांनी ठेवी गोळा करण्यासंदर्भात एजंट काम करीत असल्याचे माहिती सांगितली व एका एजंटचे नाव सांगितले इतर एजंटची नावाधावत सहकार्य करत नाही. याबाबत अधिक तपास करावयाचा आहे.

 

२०. प्राप्त सीडीआरवरुन महावीर जैन, विवेक ठाकरे, सुजित बाणी, सतिश ठाकरे हे पाहिजे आरोपी कंडारेच्या व एकमेंकाच्या सतत संपर्कात होते. आरोपींकडे अजुनही मोबाईल नंबर असण्याची दाट शक्यता आहे व पाहिजे आरोपींकडे इतर कोणते मोबाईल नंबर होते त्याबाबत अधिक तपास करणे आहे.

 

२१. आरोपी सुजित वाणी याच्याकडुन संस्थेचा ईमेल आयडी प्राप्त झाला असुन पासवर्ड बाबत तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

January 30, 2026
गुन्हे

जुन्या वादातून झालेल्या चकमकीत तरुणावर चाकू हल्ला

January 30, 2026
धरणगाव

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

January 30, 2026
गुन्हे

साकरी येथे शाळकरी अल्पवयीन मुलींच्या दुहेरी हत्येने परिसर हादरला

January 29, 2026
गुन्हे

वृद्ध महिलेच्या अस्थी वडिलांच्या समजून केले विसर्जन ; स्मशानभूमीतील बेवारस व्यवस्थेचा भांडाफोड

January 29, 2026
जळगाव

अजितदादा पवार यांना अशोक जैन यांची भावपूर्ण आदरांजली !

January 29, 2026
Next Post

चीनच्या खोड्या सुरूच, अरुणाचल प्रदेश सीमेजवळ वसवली तीन गावं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद बाबासाहेबांनी दिली : कैलास पवार !

April 24, 2023

आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

July 1, 2021

‘… म्हणून दंगलीचं कारस्थान रचलं जातंय’ : संजय राऊत

November 13, 2021

आरटीआय कार्यकर्त्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्या ; आरटीआय महासंघाचे धरणगाव तहसिलला निवेदन

May 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group