TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाउण्डेशन व मराठी विज्ञान परिषद आयोजित राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
February 28, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गांधी रिसर्च फाउण्डेशन, जळगाव व मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोह आज दि. २८ फरवरी २०२१ (राष्ट्रीय विज्ञान दिन) रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ अनुशास्त्रज्ञ व गांधी रिसर्च फाउण्डेशनचे चेअरमन डॉ. अनिल काकोडकर होते.

नॅशनल इनोवेशन चे डॉ. विपिन कुमार, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन आयंगार, ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ प्रो. जे. बी. जोशी, मराठी विज्ञान परिषदेचे मानद सचिव ए. पी. देशपांडे, गांधी रिसर्च फाउण्डेशच्या सौ. अंबिका जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. महात्मा गांधी यांच्या विचारांना अभिप्रेत ग्राम स्वराज्य निर्माण कऱण्यासाठी विज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध प्रयोग करुन उपयोगी शाश्वत व पर्यावरणपुरक तंत्रज्ञान निर्माण व्हावे म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांच्यातील कल्पना शक्तिला वाव देवून त्यांच्यातून भविष्यात चांगले संशोधक, शास्त्रज्ञ निर्माण करण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण भारतातून इ. ५ वी ते ७ वी व इ. ८ वी ते १० वी अशा दोन गटातून एकूण १९५० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. अत्यंत नाविण्यपूर्ण प्रयोग या विद्यार्थाकडून सादर करण्यात आले. डॉ. अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली परिक्षण समितीने या प्रयोगांचे परिक्षण करुन अंतिम विजेते घोषित केले. विजेते घोषित करतांना सोशल मिडियावर (Facebook & Youtube) मिळालेल्या लाईक्स चा ही काही प्रमाणात विचार करण्यात आला.

READ ALSO

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

यावेळी बोलतांना डॉ. अनिल काकोडकर यांनी विज्ञान व महात्मा गांधीजींच्या परस्पर नाते विश्वास व विचारांबद्दल मार्गदर्शन केले. महात्मा गांधी हे सत्य शोधक होते. एका शास्त्रज्ञानाप्रमाणे प्रयोगशील होते. त्यांनी आपल्या आत्मकथेचे नावच माझे सत्याचे प्रयोग असे दिले होते. त्यांचा विज्ञानाला विरोध नव्हता. तर विज्ञानाच्या माध्यमातून होत असलेल्या शोषणाला होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगाचे त्यांनी कौतुक केले व त्यातून उद्याचे संशोधक निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रो. जे. बी. जोशी यांनी विद्यार्थ्यांना यशातून आपण जितके शिकतो त्यापेक्षा जास्त अपयशातून शिकतो हे नेहमी लक्षात ठेवण्याचे आवाहन केले. आज आपला देश अजूनही अनेक बाबींमध्ये स्वयंपूर्ण झाला नाही म्हणूनच आपण आपले संशोधन करणे गरजेचे असून विद्यार्थी दशेपासूनच हे संस्कार विद्यार्थ्यांवर होण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतात. आपल्या मनोगतात डॉ. विपीन कुमार यांनी बक्षिसपात्र विद्यार्थ्यांच्या प्रयोगांना पेटंट मिळवून देण्यासाठी मदत करणार असल्याचे घोषित केले.

डॉ. सुदर्शन आयंगार यांनी आपल्या गरजा कमीत-कमी करुन त्या भागवण्यासाठी स्थानिक साधनांचा वापर करता येईल व त्यासाठी नवीन संशोधन विद्यार्थ्यांनी करुन गांधीजींना अभिप्रेत ग्रामस्वराज्य निर्माण करण्याचे आवाहन केले.  राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

बक्षिसप्राप्त विद्यार्थ्यांचे नावे पुढीलप्रमाणे.

पहिला गटातून – (इ. 5 वी ते 7 वी)

प्रथम क्रमांक (रू. 31,000 शैक्षणिक साहित्य) – श्रीराम अमोल बोधे, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा (धूळ जमा करणारा सुधारित झाडू)

द्वितीय क्रमांक (रू. 21,000 शैक्षणिक साहित्य)  –  ईश्वरी भीमराज रोहोकले,  महात्मा फुले विद्यालय भालवानी, अहमदनगर (आधुनिक सौर वॉशिंग मशीन)

तृतीय क्रमांक (रू. 15,000 शैक्षणिक साहित्य)  – सुफियान जाकिरहुसेन शेख, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, अहमदनगर (नंबर पझल)

उत्तेजनार्थ पुरस्कार (रू. 5,000 शैक्षणिक साहित्य)  – पीयूष निलेश गाढवे, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा. (व्हाइटबोर्डसाठी डस्ट फ्री डस्टर आणि क्विक फिंगर डस्टर)

उत्तेजनार्थ पुरस्कार (रू. 5,000 शैक्षणिक साहित्य)  –  1) हेमाश्री जी टी., 2) पुनिता बी., 3) तेगराजन जी., तक्षिल्ला ग्लोबल स्कूल, तिरुपटुरे, तामिळनाडू (सांघीक) (मोबाईल दरवाजा सुरक्षा अलार्म चे सुधारित मॉडेल)

उत्तेजनार्थ पुरस्कार (रू. 5,000 शैक्षणिक साहित्य)   – ओम विनोद अवारे  पीडी. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय, लोणी, अहमदनगर (स्मार्ट फ्रुट पिकर)

उत्तेजनार्थ पुरस्कार (रू. 5,000 शैक्षणिक साहित्य)  –  रुतिक रवींद्र इंगळे  एस. बी हायस्कूल, तेल्हारा, अकोला (स्मार्ट आणि स्वच्छ बस)

दुसऱ्या गटातून – (इ. 8 वी ते 10 वी)

प्रथम क्रमांक (रू. 31,000 शैक्षणिक साहित्य)  – शिवानी रावसाहेब म्हस्के,  श्री संतुकनाथ अंग्रेजी विद्यालय, जेऊर बा, अहमदनगर (विक्री कौशल्य)

द्वितीय क्रमांक (रू. 21,000 शैक्षणिक साहित्य) –  आदित्य अशोक अहिरे,  श्री. जी आर औताडे पाटील विद्यालय, ता. कोपरगाव, अहमदनगर (आम आदमी सौर वॉटर हीटर)

तृतीय क्रमांक (रू. 15,000 शैक्षणिक साहित्य)   – तावरे हर्षल गोरख, श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती, पुणे (ध्वनी वेव्हज डिटेक्टर)

उत्तेजनार्थ पुरस्कार (रू. 5,000 शैक्षणिक साहित्य)   – जय दिनकर ढाके, विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव. (स्वयंचलित तापमान फीडर)

उत्तेजनार्थ पुरस्कार (रू. 5,000 शैक्षणिक साहित्य)   –  ऐश्वर्या हीरो मोटवानी,  एसपीपी न्यू एरा हायस्कूल, ठाणे (स्वच्छता कार्यरत मॉडेल)

उत्तेजनार्थ पुरस्कार (रू. 5,000 शैक्षणिक साहित्य)   – निहार अमोल मुंज,  सह्याद्री माध्यमिक विद्यालय, बडगांव, सिंधुदुर्ग (डायपरचा पुर्नवापर कसा करावा)

उत्तेजनार्थ पुरस्कार (रू. 5,000 शैक्षणिक साहित्य)  –  साहिल कलमु मुजावर, श्री नानादिकेश्वर विद्यालय, उपलाई, सोलापूर (फ्रेश मशिन)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
Next Post

धक्कादायक ! मतिमंद मुलीने ३३ वर्षीय मतीमंद तरुणीला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुक्यातील मुसळी गावात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती कच्चा घराला भेट ; आज लाभार्थ्याला मिळाले पक्के घरकुल

April 3, 2025

गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम

September 7, 2021

धरणगाव शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक

December 23, 2021

हिंगोणेजवळील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू !

February 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group