जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) सीए महावीर जैन, धरम किशोर सांखला, सुजीत सुभाष बाविस्कर (वाणी), विवेक ठाकरे अशा अटकेतील चारही आरोपींना आज पुणे न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, रंजना खंडेराव घोरपडे (निवृत्त माध्यमिक शिक्षिका, रा.वृंदावन सोसायटी भोसले नगर पुणे) यांच्या फिर्यादीवरून तब्बल १० जणांविरुद्ध २५ नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला होता.
रंजना खंडेराव घोरपडे (निवृत्त माध्यमिक शिक्षिका, रा.वृंदावन सोसायटी भोसले नगर पुणे) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी सुजित सुभाष बाविस्कर उर्फ वाणी ,धर्म किशोर सांखला महावीर मानक जैन, विवेक देविदास ठाकरे, माहेश्वरी, अवसायक जितेंद्र खंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, योगेश सांखला व इतर यांनी मिळून १७ लाख ८ हजार ७४२ रुपयाचा अपहार व फसवणूक केलेली आहे. दरम्यान, सदरच्या प्रकरणात फिर्यादी व त्यांची बहीण या दोघांनी मिळून गुंतवलेली १६ लाख ९० हजार १४२ रुपये विवेक ठाकरे याने इतर आरोपींनी संगणमत करून पैसे मिळवून देण्यासाठी १८ हजार ६०० रुपये घेऊन फसवणूक व अपहार केला आहे. दरम्यान, अटकेतील चारही आरोपींना ६ डिसेंबर २०२० पर्यंत कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील, पोलीस निरीक्षक सुचिता खोकले हे करीत आहेत.