जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा अवसायक जितेंद्र कंडारेने जामीनसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तर शिक्रापूरच्या गुन्ह्यात सुनील झंवरच्या जामीन अर्जावर गुरुवारी निकाल लागण्याची शक्यता आहे.
बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा अवसायक जितेंद्र कंडारेला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोरमधून अटक केली होती. दरम्यान, कंडारेने आज जामीनसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आजपासून जामीन अर्जावर कामकाजाला सुरुवात झाली असून ८ नोव्हेंबरला पुढील सुनवाई होणार आहे. दुसरीकडे तर शिक्रापूरच्या गुन्ह्यात सुनील झंवरच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाला असून २८ ऑक्टोंबरला निकाल लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, विशेष सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांनी कंडारे आणि झंवरच्या जामीन अर्जाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.