TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : पोलीस तपासात समोर आले २२ खळबळजनक मुद्दे !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 6, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आर्थिक घोटाळ्यात पोलीस तपासात तब्बल २२ खळबळजनक मुद्दे समोर आले आहेत. त्यात प्रामुख्याने अवसायक जितेंद्र कंडारे यांनी तात्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना  दिलेल्या स्पष्टीकरणाचे मूळ पत्र  अटकेतील संशयित महावीर जैन यांच्या कार्यालयातून मिळून येणे. तसेच महावीर जैन यांच्या कार्यालयीन झडतीमध्ये करण बाळासाहेब पाटील या कर्जदाराची साडेतीन कोटी रुपयांच्या कर्जाची मूळ फाईल मिळून आल्याचा खळबळजनक मुद्द्यांचा समावेश आहे.  एवढेच नव्हे तर, अटकेतील सर्व संशयितांकडूनही महत्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली आहे.

 

READ ALSO

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

आत्तापर्यंत तपासात निष्पन्न झालेल्या बाबी

 

महावीर माणकचंद जैन

१. गुन्हयातील अटक आरोपी व इतर पाहीजे आरोपी यांच्या घरझडती, ऑफिस झडती . बैंक लॉकर्स, व इतर आवश्यक त्या ठिकाणची झडती कार्यवाही झाली असून त्या ठिकाणी मोठया प्रमाणावर दस्तऐवज व गुन्हया संबंधी इतर इलेक्ट्रॉनिक व पुरावे मिळून आले आहेत.

२. अटक आरोपी महावीर जैन याच्या कार्यालय झडतीमध्ये पाहिजे आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे व इतर यांच्याशी संबंधीत पुरावे मिळून आले आहेत.

 

३. पाहिजे आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे यांनी सहकार आयुक्त व निंबधक सहकारी संस्था (म. रा. पुणे) यांना दिलेले पत्रामध्ये मालमत्ता लिलावाद्वारे विक्री करताना ठेवीदारांच्या ठेवी वर्ग केल्याचे नमुद केले नाही. ते पत्र अटक आरोपी महावीर जैन यांच्या कार्यालयातील झडती मध्ये मिळाले आहेत. ही बाब सीए महावीर जैन यांनी आपल्या ऑडिट रिपोर्ट मध्ये नमुद न करता अवसायक जितेंद्र कंडारे यांना जाणीवपूर्वक मदत करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवली. अशा प्रकारे खोटा दस्ताऐवज तयार करुन ते खरे असल्याचे भासवून स्वतःच्या व इतर आरोपीच्या फायदयासाठी उपयोग केला.

४. अटक आरोपी महावीर जैन याच्या कार्यालयीन झडतीमध्ये करण बाळासाहेब पाटील या कर्जदाराची साडे तीन कोटी रुपयांच्या कर्जाची मूळ फाईल मिळून आली. या फाईलचा ऑडीट रिपोर्टशी काहीएक संबंध नाही. तपासात असे निष्पन्न झाले आहे की, अवसायक जितेंद्र कंडारे हे महावीर जैन यांच्या कार्यालयामध्ये मोठया रकमेच्या कर्ज प्रकरणाच्या फाईल पाठवत होते. सदरची बाब सुध्दा महावीर जैन कडुन तपासात निष्पन्न झाली आहे. तसेच यासाठी लागणारी ठेवीदारांची माहिती जुन्या सर्व्हरमधून बीएचआर कर्मचा-या मार्फत काढून अवसायक जितेंद्र कंडारे हे पूरवत होते.

 

५. तपासात निष्पन्न झाले की, ऑडिट रिपोर्टशी संबंधित नसणारा तक्रारदार अनवर अहमद अत्तार याचा तक्रारी अर्जाची छायांकित प्रत कार्यालय झडतीमध्ये मिळुन आली. त्यामध्ये त्याने त्याच्या ठेवीची रक्कम रु.७ लाख ६० हजार ५७३ पैकी फक्त ३५ टक्के रक्कम त्याला मिळाली असुन ती विजय रतीलाल लोढा याच्या खात्यातून जमा झाल्याचे दिसते. प्रत्यक्षात ती रक्कम पतसंस्थेने द्यायला हवी होती. तसेच त्याने कोरा स्टॅम्प पेपर देखील सही करून दिला होता. त्या गैरवापर झाल्याचे त्याने तक्रारीत नमुद केले आहे.

 

६. पाहिजे आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दिलेल्या स्पष्टीकरणाचे मूळ पत्र अटक आरोपी महावीर जैन यांचे कार्यालयात मिळून आले आहे. सदरचे मूळपत्र जैन कार्यालयात असण्याचा काही संबंध नाही.

७. तपासात असे निष्पन्न झाले की, महाराष्ट्र शासनाचे लेखा परिक्षण नियुक्तीबाबतचे पॅनल असतांना व शासनाने फी अदा करण्याची तरतुद असताना महावीर जैन याची नेमणुक तो पॅनलमध्ये नसताना व त्याची सर्व फी पाहिजे आरोपी जितेंद्र कंडारे याने संस्थेतून त्यांच्याच विरुध्द सुरु असलेल्या चौकशीतील लेखापरिक्षकास दिली.

८.तपासात असेही निष्पन्न झाले की, लेखापरिक्षणाच्या वेळी पत्र व्यवहार सदर अटक आरोपी हा पाहिजे आरोपी जितेंद्र कंडारेला पुरवत होता.

९.तपासात असे निष्पन्न झाले की, अटक आरोपी महावीर जैन याने पाहिजे आरोपी कंडारेच्या काळातील अपहार उघड होयु नये म्हणुन खोटे दिशाभुल करणारे मत नोंदविले.

सुजित सुभाष बावीस्कर उर्फ वाणी

१० लिलावाच्या मालमत्तेची मूल्यांकन वारंवार स्वतःच्या सोयीने पाहिज आरोपी जितेंद्र कंडारे हे बदलून घेत होते. त्यासाठी त्यांना व्हेल्युअर अविनाश सोनी हे मदत करत होते व त्यासंदर्भातले कागदपत्रे संस्थेत तयार होत नव्हते.

११. एफडी मैचिंग करता बनविण्यात येणा-या अँफेडिव्हिटचा ड्राफ्ट पाहिजे आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या संगणकामध्ये सेव्ह होता. ते सदरचा ड्राफ्ट प्रिंट करुन एंजट कडे व कर्जदाराकडे देत असायचे एजंट पगारीया व इतर हे वारंवार येत असत. यासाठी लागणारी कर्जदार व ठेवीदार यांची यादी जुन्या सर्व्हर मधून कर्मचा-याकडून अवसायक जितेंद्र कंडारे घेत होते. कंडारेच्या सांगण्यावरून नमुद संशयित आरोपी फाईल काढून देत होते. कंडारे यांच्या कार्यालयामध्ये महावीर जैन, झंवर हे अशा फाईल संबंधाने चर्चा करण्यासाटी येत होते. या फाईल जितेंद्र कंडारे हे जैन यांच्या ऑफिसमध्ये घेवून जात होते.

१२. पारस ओसवाल हे पतसंस्थेमध्ये अकाऊटंट आहेत. ते सर्व कर्मचा-यांना अकाऊट साठी मार्गदर्शन करतात. तसेच ते पतसंस्थेच्या लिलाव कमिटीवर होते. पाहिजे संशयित आरोपी सुनिल झवर. जितेंद्र कंडारे व अटक आरोपी महावीर जैन यांच्याकडे ते लिलावाच्या फाईल संबंधी चर्चा करण्यासाठी जात होते.

१३. ठेवी गोळा करण्यासंदर्भात एजंट काम करीत असल्याचे माहिती सांगितली व एका एजंटचे नाव सांगितले इतर एजंटची नावाबाबत सहकार्य करत नाही.

 

विवेक देविदास ठाकरे

 

१४. विवेक ठाकरे हे ठेवीदारांना पैसे मिळवून देण्यासाठी जनसंग्राम सामाजिक विकास व श्रमिक संघटना जळगाव या संघटनेच्या माध्यमातून पैसे गोळा करुन काम करत होते. त्यानी आतापर्यंत किती ठेवीदाराचे पैसे परत मिळवून देण्यासठी प्रयत्न केले याबाबत त्याच्याकडे प्रत्येक वेळी वेगवेगळी व उडवाउडवीची उत्तरे दिली.

१५. तसेच त्याचे घर झडतीमध्ये ठेवीदाराचे कोरे चेक व शंभर रुपये किंमतीचे कोरे स्टॅम्प पेपर व मूळ ठेव पावत्या मिळून आल्या आहेत.

१६. त्यांनी ठेवीदाराकडून पैसे परत मिळवून देण्याच्या नावाखाली सभासद शुल्क रु १०००/- पाठपुरावा शुल्क रु ७१००/-. प्रोसेसिंग फी रु १२००/- असे प्रत्येकी रोख रुपये ९३००/- आणि ठेवीचे पैसे परत मिळाल्यानंतर २० टक्के कमिशन रोखीने किंवा चेकने असे ४ प्रकारे घेतले आहेत व ठेवीदारांची फसवणूक केली आहे.

१७. हे पैसे त्यांने स्टेट बँक ऑफ इंडिया, स्वातंत्र्य चौक, जळगाव या बँकेच्या खात्यावर जमा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

१८. त्याचे रजिस्टर संघटनेची नोंदणी मा सहाय्यक कामगार आयुक्त, नाशिक यांनी सप्टें २०१८ मध्ये रद्द केली त्यानंतर देखील त्यांने जनसंग्राम बहुजन लोकमंच या नोंदणी नसलेल्या संघटनेचे नायाने ठेवीदारांकडून शुल्क स्विकारुन ठेवीदारांची फसवणुक केली.

१९. अटक आरोपी विवेक ठाकरे हा पुणे येथे येवुन सारसबाग, आयबी रेस्ट हाऊस ला ठेवीदारांच्या संदर्भात मिटिंग घेत होता.

 

धरम किशोर सांखला

२०. पतसंस्थेचे ऑडिटर असल्याचे त्याने मान्य केले आहे. तसेच ते पतसंस्थेचे त्यामुळे त्यांना पतसंस्थेचे ठेवीदार व कर्जदार व इतर सर्व व्यवहाराची सर्व माहिती असल्यामुळे त्याने कंडारेला हे गैरव्यवहार करण्यासाठी संगनमताने मदत केली आहे हे तपासात निष्पन्न झाले आहे.

२१. स्वतः पतसंस्थेचे ऑडिटर म्हणून कामकाज पाहत असताना पतसंस्थेतून स्वतः व कुटुंबाच्या नावे अंदाजे साडेचार कोटी रुपयाचे अससुरक्षित कर्ज घेतलेचे निष्पन्न झाले आहे.  तसेच सदरचे कर्ज फेडीसाठी अनोळखी ठेवीदाराच्या ठेव पायत्या कर्जामध्ये वर्ग करुन कर्ण कंडारे यांच्या संगनमताने निरंक केले आहे.

 

कमलाकर भिकारी कोळी

२२. हा मुख्य पाहिजे आरोपी जितेंद्र कंडारे यांचे गाडीवर घालक आहे. गुन्हा दाखल होताना हाच कंडारे यांचे सोबत अहमदनगर येथे मुक्कामी होता. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तो कंडारे यांना कोठे सोडले याबाबत काहीच माहिती दिली नाही. तसेच गुन्हा घडत असताना इतर आरोपीशी झालेल्या मिटींग व भेटी घेण्यासाठी जाताना चालक म्हणून सोबत असे, परंतु अशा भेटी बाबत त्याने काही माहिती दिली नाही. तसेच त्याने अहमनगर येथील मुक्कामाचे ठिकाण दाखवले परंतू तेथून आरोपी कंडारे कोठे गेला याची माहिती दिली नाही.  दरम्यान, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांचेशी संबंधित मूळ पत्र अटक आरोपी महावीर जैन यांच्या कार्यालयात कसे आले या बाबत त्यांनी संयुक्तिक माहिती दिली नाही, तसेच या प्रकारचे दस्त त्यांच्या कार्यालय झडतीमध्ये मिळून आलेले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

'बीएचआर' घोटाळा : वाढीव पोलीस कोठडीसाठी पोलिसांनी दिली तब्बल २१ कारणे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १२ जुलै २०२३ !

July 12, 2023

कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढला तर आटोक्यात आणणे कठीण होईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

March 17, 2021

आ.चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भानखेडा येथे शालेय साहित्य व पाणी कॅन भेट !

September 23, 2022

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 18 जानेवारी 2024 !

January 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group