जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपी सुनील झंवरचे नाशिकमध्ये बोरा नामक ठेकेदार व आणखी एका धान्य व्यापाऱ्यांशी कनेक्शन असून सातपूर-अंबड औद्योगिक क्षेत्रातही अनेक कंपन्या आणि बेनामी व्यवहार झाले असल्याची चर्चा आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तपास सुरु आहे, अशी सूचक प्रतिक्रिया दिलीय. दरम्यान, यानिमित्ताने नाशकात सुनील झंवर सोबत कनेक्शन असणाऱ्यांच्या कंपन्या आणि बेनामी व्यवहार रडावर आले असल्याचे कळते.
बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपी सुनील झंवरचे नाशिकमध्ये बोरा नामक ठेकेदार व आणखी एका धान्य व्यापाऱ्यांशी कनेक्शन असून सातपूर-अंबड औद्योगिक क्षेत्रातही अनेक कंपन्या आणि बेनामी व्यवहार झाले असल्याची चर्चा आहे. याबाबत नाशिकच्या माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाले आहे. त्यानुसार नाशिकमधील धान्य व्यापारी व महापालिकेतील ठेकेदार बोरा या दोघांच्या माध्यमातून नाशिकमध्ये औद्योगिक वसाहती बरोबरच इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर, गंगापूर, दरी, मातोरी आदी भागात अनेक मोठ्या फार्महाउस व्यवहार झाल्याच्या तक्रारी तपास यंत्रणेला मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, झंवर यांच्यावर अटकेची तलावर असल्यामुळे नाशिकमधील त्यांच्याशी संबंधित लोकं अंडरग्राऊंड झाल्याचे कळते. झंवर शनिवारी रात्री जवळ नाशिकला आश्रय घेण्यासाठी निघाला होता. मात्र, पुणे पोलिसांनी याबाबत नाशिक ग्रामीण पोलिसांना कळविले होते. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी एक पथक पहाटेच्या सुमारास झंवर मुक्काम करणार असल्याच्या ठिकाणी सापळा रचला होता. दरम्यान, याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तपास सुरु आहे, अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.