TheClearNews.Com
Sunday, December 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : संशयितांना होती मल्टीप्लाईड गुन्ह्यांच्या पुनरावृत्तीची भिती?

The Clear News Desk by The Clear News Desk
August 18, 2021
in गुन्हे, जळगाव, बीएचआर घोटाळा, राज्य
1
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील बीएचआर पतसंस्थेच्या सध्या गाजत असलेल्या घोटाळ्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात डेक्कन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य संशयीत सुनील झंवर यास अटक केल्यावर जसे २०१५ साली तत्कालीन चेअरमन प्रमोद रायसोनी व इतर १४ संचालकांवर मल्टीप्लाईड गुन्हे दाखल करण्याची मोहीम ठेवीदारांनी राबवली होती तसे होऊ नये, या भीतीने पडद्याआड अनेक घडामोडी घडल्याची एक वेगळीच चर्चा आता समोर येत आहे.

 

READ ALSO

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

जुन्या वादाची खुन्नस ठेवून फायनान्स कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून

बीएचआर मल्टिस्टेट पतसंस्थेच्या अवसायकांनी केलेल्या कथित गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर रोजी पुण्याच्या डेक्कन पोलिसांत दाखल गुन्हयात पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून राबवण्यात आलेले अटकसत्र, दोषारोप पत्रात नमूद घोटाळ्याची गुंतागुंत, मालमत्ता विक्रीतील गैरव्यवहारात सहभागी व्हाईट कॉलर रॅकेट व त्यांचे पेरलेले दलाल, त्यातील जामिनावर संशयित बाहेर आल्याची पार्श्वभूमी लक्षात घेता एकूणच या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने ‘अंदर की बात’ बाहेर आल्यामुळे काही जण बाहेर पडल्यानंतर अधिकचे सक्रिय होतील व रायसोनी पतसंस्थेच्या चेअरमन प्रमोद रायसोनी यांच्यासह १४ संचालकांवर दाखल झालेल्या तत्कालीन गुन्ह्यांप्रमाणे या प्रकरणात सुद्धा राज्यातील इतर ठिकाणी गुन्हे दाखल होतील आणि या प्रकरणाचा फोकस संबंधिताकडे जाऊ नये?, या भीतीने पद्धतशीरपणे पडद्याआड काही खेळी खेळल्या गेल्याची चर्चा आहे.

 

दोषारोपपत्रात असा मांडलाय हिशोब !

 

गेल्यावर्षी २७ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या पहिल्या दोषारोप पत्रात पोलिसांनी उघड केलेल्या तपासाच्या महत्वपूर्ण कागदपत्रातून ठेवीदारांची फसवणूक करत मालमत्ता विक्रीतून गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवल्याचे दिसत आहे. या दोषारोप पत्रात ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १८३ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे म्हटले आहे. यात मालमत्ता विक्री प्रक्रियेत अवसायक जितेंद्र कंडारे, प्रमुख संशयित सुनील झंवर, सीए.महावीर जैन व सुरज झंवर यांचा सहभाग असल्याचा ठपका असून यामुळे संस्थेच्या मालमत्ता विक्रीत ४८ कोटी ५६ लाख २५ हजार ८२० रुपयांचे संस्थेचे नुकसान झाल्याचे तपासात पुढे आले आहे.

 

धरम सांखला याने ठेविदार व कर्जदारांच्या व्यवहाराची माहिती असल्याने त्याने कंडारेस हाताशी घेऊन स्वतःचे व कुटुंबाच्या नावे घेतलेले कर्ज फेडतांना १० कोटी ४० लाख ९८ हजार ५४९ रुपयांचे संस्थेचे व ठेवीदारांचे नुकसान केल्याचे तपासात निष्पन्न केले आहे. याशिवाय फिर्यादीचे व त्यांच्या बहिणीचे मिळुन १६ लाख ९० हजार १४२ रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच जितेंद्र कंडारे, सुनील झंवर, सुरज झंवर,महावीर जैन व धरम साखला यांच्या प्रत्येकावर काहींना काही आर्थिक रकमेचा स्वयंस्पष्ट ठपका ठेवण्यात आलेला आहे.

 

विवेक ठाकरेसह कोळीवर आर्थिक ठपका नाही

 

विवेक ठाकरे, सुरज झंवर याच्यासह पहिल्या सहा आरोपींना अटक झाल्यानंतर २३ फेब्रुवारी दाखल केलेल्या या दोषारोपपत्रात विवेक ठाकरे, कमलाकर कोळी यांच्यावर मात्र या ६२ कोटींच्या गैरव्यवहाराच्या रकमेत अमुक-अमुक रकमेचा गैरव्यवहार अशाप्रकारे ठपका दिसत नाही. ठाकरे यांनी फक्त मिटींगा घेऊन काही ठेवीदारांकडून हजार-हजार व सात हजार शंभर रुपये गोळा केले असा आरोप आहे. दरम्यान, ठेवीदारांच्या लढ्यासाठी संघटनेच्या नावावर हा निधी गोळा केल्याचे ठाकरे यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले होते. तर कमलाकर कोळीने जितेंद्र कंडारेला कोणत्या ठिकाणी सोडले?, याची माहिती पोलिसांना दिली नाही. तसेच कंडारेला पळून जाण्यास मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

दोषारोप पत्रानुसार पुर्वनियोजीत कटाची रुपरेषा

 

तपासात असे निष्पन्न झाले की, सुरुवातीला जितेद्र कंडारे, महावीर जैन, विवेक ठाकरे, सुजित वाणी, सुनिल झंवर, सुरज झंवर व धरम साखला या संशयित आरोपींनी गैरहेतुने बीएचआर संस्थेतील मालमत्ता व ठेवीदारांच्या पैशाचा अपहार करण्याचा गुप्त कट रचला. सदरच्या गुप्त कटात त्यांनी एक विचाराने गैरकृत्य व गैरमार्ग अवलंबवून बीएचआरच्या मालमत्ता व ठेवीदारांच्या पैसा अपहार करायचा, यासाठी संशयित आरोपींनी अनेक गैरकृत्य केली व भा.द.वि.चे कलम १२० (ब) प्रमाणे गुन्हा केला.

 

तपासात असे निष्पन्न झाले की, सदरचा पुर्वनियोजीत कट हा जरी वरील संशयित आरोपींनी केलेला असला तरीसुध्दा सदरच्या गुप्त कटामध्ये वेळोवेळी इतरही आरोपी सहभागी होवून त्यांनी सदरचा पुर्वनियोजीत कट अंमलात आणण्यासाठी महत्वाची भूमिका प्रत्यक्ष कृती करून बजावलेली आहे. यात कुणाल शहा, प्रकाश वाणी, विकास चोरडीया, अनिल पगारीया या व्यक्तींनी सहभागी होवून प्रत्यक्ष कृती करुन गुप्त कट अंमलात आणलेला आहे.

 

तपासात असेही निष्पन्न झाले की, जितेंद्र कंडारे, सुनिल झंवर, महावीर जैन या अत्यंत प्रभावशाली व्यक्ती होत्या. बीएचआरचा अवसायक संशयित आरोपी जितेंद्र कंडारे व संशयित आरोपी सुजित वाणी हे एकमेकांचे चांगले परिचयाचे आहेत. जितेंद्र कंडारे हा यापूर्वी सिद्धी व्यंकटेश सहकारी बँक जळगाव येथे अवसायक असताना सुजित वाणी हा तेथे कॅशीअरचे काम करीत होता. प्रमोद माळी हा बीएचआरमध्ये पूर्वीपासूनच व्यवस्थापक म्हणून नोकरीस होता व त्याला व्यवहाराची संपूर्ण कल्पना होती. तर संशयित आरोपी धरम साखला हा बीएचआरचा सन २००८ पर्यंत सनदी लेखापाल तर सन २००३ ते २०१४ पर्यंत टॅक्स ऑडीटर म्हणून कार्यरत होता. तसेच धरम साखला याचा पार्टनर निरज कासट याने सन २०१२ ते २०१४ पर्यंत बीएचआरचे लेखापरिक्षणही केले आहे.

 

धरम साखला याचा भाऊ योगेश साखला याने टॅक्स भरण्याचे कामकाज केलेले आहे. योगेश साखला व धरम साखला यांचे कार्यालय एकच आहे. संशयित आरोपी महावीर जैन हा जळगावातील एमआयडीसीचे संदर्भात कामे करतो. तसेच बीएचआरचे कार्यालय देखील एमआयडीसी येथे असल्याने महावीर जैन व जितेंद्र कंडारे यांची ओळख व संबंध होते. महावीर जैन याच्या पत्नीचा भाऊ आकाश कांकरीया याचा मित्र सुरज झंवर व त्याचे वडील सुनिल झंवर यांच्याकडे महावीर जैनचे जाणे-येणे होते. तर विवेक ठाकरेदेखील बीएचआर व कंडारेशी सुरूवातीपासूनच संलग्न होता.

 

तपासात असेही निष्पन्न झाले की, धरम साखला याला बीएचआरच्या व्यवहारांची, ठेवीदार, कर्जदार, मालमत्ता, बेनामी ठेवीदारांची तो टॅक्स ऑडीटर असल्याने माहिती होती. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, सुनिल झंवर हा प्रभावशाली व्यक्तिंच्या जवळचा असून आर्थिकदृष्ट्या व राजकियदृष्ट्या सुध्दा प्रभावशाली होता. तसेच प्रकाश वाणी याने मंत्रालयात व शासकिय यंत्रणेत मोठया पदावर काम केल्याने तो सुध्दा प्रभावशाली होता.

 

 

विजय वाघमारे (9284058683)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

December 20, 2025
गुन्हे

जुन्या वादाची खुन्नस ठेवून फायनान्स कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून

December 20, 2025
जळगाव

अनुभूतीच्या एड्युफेअर मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी – प्रेम कोगटा

December 19, 2025
मुक्ताईनगर

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

December 19, 2025
गुन्हे

नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

December 19, 2025
जळगाव

कौटुंबिक स्नेहसंमेलनाने महावितरण कर्मचाऱ्यांना मिळाली नवी ऊर्जा

December 18, 2025
Next Post

कजगाव येथे एकाच रात्री चोरट्यांनी फोडली दोन दुकाने

Comments 1

  1. Kiran Dixit, Pune .Mob. 7276050151 says:
    4 years ago

    बीएचआर प्रकरणांत MPIDअंतर्गत एफआयआर नोंदवून घेतलेल्या पोलीस चौकीने(डेक्कन मुख्य शाखा व इतर) वेळीच कारवाई केली असती तर सर्व मालमत्तांचा गैरव्यवहार रोखता आला असता.जागरूक ठेविदारांनी एफआयआर नोंदवून,सीआयडीला सहकार्य करूनही ह्या सरकारी अधिकार्‍यांनी ठेविदारांची फसवणूक केली आहे.कंडारेविरूध्द तक्रारी केंद्राला पाठवण्यापासून आताही आर्थिक गुन्हे शाखेला एफआयअर करण्यासही पूर्ण सहकार्य करूनही एक ठेविदार म्हणून माझी फसवणूक(स्थानिक पोलिस खाते,सीआयडी आणि आर्थिक गुन्हे शाखेने केलेली आहे.आजही एक त्रस्त असंघटित ठेविदार व अधिकृत सरकारी सुरक्षा व न्याय व्यवस्थेला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मदत करणारा असूनही पैसे कधी मिळणार ह्या विवंचनेत आहे.
    किरण दीक्षित,पुणे. मोबा.७२७६०५०१५१ वाॅटस् अप.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दशमा भवानीच्या नृत्यात रंगले पालकमंत्री

April 13, 2025

कर्ज म्हणून हाती टेकवल्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा ; भुसावळात कल्याणच्या ठेकेदारास गंडवले !

September 1, 2022

अमळनेरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा -संघटनेची मागणी

October 8, 2020

Crashed Lion Air Jet Had Faulty Speed Readings on Last 4 Flights

July 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group