TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : पोलिसांना करायचीय झंवरची सखोल चौकशी ; ‘या’ १४ मुद्द्यांची मिळवणार माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 20, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरची पोलीस कोठडी वाढवून मिळण्यासाठी आज पोलिसांनी महत्वपूर्ण कारणं न्यायालयासमोर सादर केली आहेत. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांना झंवरची सखोल चौकशी करायची असून त्याने माहिती न दिलेल्या किंवा उडवाउडवीची उत्तरं दिलेल्या १४ मुद्द्यांवर पुढील काही दिवसात त्याच्याकडे विचारपूस होणार आहे.

१) सुनील झंवरच्या कार्यालयामधील पंचनाम्यामध्ये धीरज सोनी, सुनिल मुरलीधर मालु, राहुल सुभाषचंद्र बोहरा, चंदुभाई पटेल यांचे कर्ज निरंक संबंधी मुळ अॅफिडेव्हिट मिळुन आलेले आहेत. या फाईल सुनील झंवरने उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत.
२) झंवरच्या कार्यालयात मिळालेल्या राजेंद्र बापुराव मोरे याच्या टेंडर लिफाफ्याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आहे.
३) सुनील झंवरने ठेवीदार राजेंद्र इंगोलेच्या ठेवी घेतल्याचे व त्याच्यासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रातील मजकुर मान्य केला. परंतु इंगोले त्यांच्याकडे कसा आला?, याविषयी काहीएक माहिती दिली नाही.
४) महावीर जैन सोबत असलेले संबंध त्यांच्या बीएचआर पतसंस्थेसंबंधी झालेल्या भेटीगाठी व बैठका याबाबत सुनील झंवरने उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत.
५) सुनील झंवरच्या कार्यालयातील कर्मचारी इतर टेंडर धारकांकरीता का हजर राहिलेत? याविषयी झंवरने उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत.
६) गुन्हा दाखल झाल्यापासुन झंवरचे वास्तव्य इंदौर व नाशिक याठिकाणी होते. नाशिक येथे तपास करण्यात आला आहे. इंदौर येथे ज्या व्यक्तीकडे राहत होता, त्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत.
७) सुनील झंवरचे राहते घर व कार्यालय झडती पंचनाम्यामध्ये मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेले दस्तऐवज व इलेक्ट्रॉनिक पुरावे त्याला दाखविण्यात आलेले आहेत. त्यापैकी काही दस्ताबाबत झंवरने माहिती दिली असुन इलेक्ट्रॉनिक पुराव्याबाबत समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत.
८) टेंडर भरणारे व्यक्ती आपल्याशी संबंधित असल्याचे मान्य केले. परंतु टेंडर फॉर्म कोणाकोणाच्या हस्ताक्षरात भरले गेलेले आहेत. याबाबत सुनील झंवरने समाधानकारक माहिती दिलेली नाही.
९) सुनील झंवर याने सुदेश भन्साळी व जितेंद्र तातेड यांना मालमत्ता विकत घेण्याकरीता दिलेली रोख रक्कम व एफडी याची संयुक्तिक माहिती दिलेली नाही.
१०) सुनील झंवरच्या कार्यालयातील हार्डडिस्कमध्ये मिळुन आलेल्या ठेवीदार यादी, कर्ज निरंक दाखले, अॅफिडेव्हिटचा ड्राफ्ट, एजंटची नावे व बीएचआर पतसंस्थेच्या संपूर्ण मालमत्तांची यादी बाबत अपुरी माहिती दिलेली आहे.
११) बीएचआर पतसंस्थेसाठी बनविण्यात आलेली सॉफ्टवेअर सुनिल झंवर याच्या कार्यालयात कशासाठी इन्स्टॉल केलेले होते?, बीएचआर पतसंस्थेचे कार्यालय लिंक केलेले होते, लिलाव प्रक्रिया कशी नियंत्रीत केली गेली?, याबाबत झंवरने काहीएक माहिती दिलेली नाही.
१२) सुनील झंवरशी संबंधित असलेले अकाऊटंट पारसमल ओसवाल, व्हॅल्युअर अविनाश सोनी व त्याच्या साई पार्सल या कंपनीच्या व्यवसायाकरीता सॉफ्टवेअर बनवणारा कुणाल शहा हेच इसम त्याच कामासाठी बीएचआर पतसंस्थेमध्ये कसे नियुक्त झाले आहेत?, याबाबत झंवरने उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत.
१३) सुनील झंवरच्या कार्यालय झडतीमध्ये विविध शासकीय कार्यालयातील बनावट शिक्के व विविध पदाधिका-यांचे कोरे लेटर पॅड मिळून आलेले आहेत. याविषयी झंवरने उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत.
१४) सुनील झंवरच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक पुराव्याचे फॉरेन्सिक ऑडिट सुरु आहे. त्यामध्ये नमुद दोघां संशयितांचे राजकीय व इतर व्यक्तींशी आर्थिक लागेबांधे असल्याचे पुरावे मिळुन आले आहेत. याबाबत झंवरने अपुरी माहिती दिली आहे. याबाबत झंवरकडे तपास करायचा बाकी असून सदरचा मूळ कागदोपत्री पुरावा पोलीस हस्तगत करणार आहेत. दरम्यान, पोलीस पुढील काही दिवसात सुनील झंवरकडून वरील मुद्द्यांचा सखोल तपास करणार आहेत.

READ ALSO

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

"कॉंग्रेस आपल्या दारी" ; पाचोरा काँग्रेसचा अभिनव उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या दाम्पत्यांची ३५ लाखात फसवणूक ; पोलीस अधिकाऱ्याकडून न्यायालयात दिशाभूल !

July 6, 2021

धरणगाव येथील गुड शेपर्ड स्कुलचा प्रणित जाणार इस्रो च्या सहलीला

February 1, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2025 !

August 7, 2025

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group