पिंप्री खुर्द ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथे नुकताच ग्रामपंचायत कार्यालयतर्फे विवीध विकास कामांचे भुमिपुजन सोहळा जिल्हयाचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तसेच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी जि.प. सदस्य गोपाल चौधरी, ग्रापंचायत सरपंच सौ. सरलाबाई बडगुजर, उपसरपंच मंगल आण्णा पाटील, पि एम पाटील, माजी पं.समिती सभापती अनिल नाना पाटील, भगवान महाजन, डि .ओ. पाटील, ईश्वर धोबी घनश्याम चौधरी, शिवा महाजन यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच बहुसंख्य ग्रामस्त उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी बोलतांना ना. गुलाबराव पाटील यांनी आजपर्यंत पिंप्री गावात मला मतदान कमी पडले नाही तसेच विकास कामासाठी निधी कमी पडु देणार नाही, अशी ग्वाही दिली. तसेच ग्रामपंचायत व आमच्या निधीतुन एकुण ४८ लाख रुपयांचे काम देण्यात आले. गावात अंडरग्राऊड गटार काढून त्याचे पाणी नदी काठी काढुन ते पाणी फिल्टर करून शेतकऱ्यांना आपल्या शेतात या पाण्याचा वापर होईल अशी योजना करु. तसेच मंदिरासाठी सौरक्षण भिंत व विवीध विकास कामासाठी निधी कमी पडु देणार नाही अशी माहीती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.