TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर दगडी दरवाज्याच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
October 24, 2020
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील बहुचर्चित वेस (दगडी दरवाजा) चे भूमिपूजन सोहळा आज सकाळी १० वाजता आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते नगर अध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

दगडी दरवाजाचा आजपर्यंतचा खडतर प्रवास
अमळनेर वेस(दगडी दरवाजा) संरक्षित स्मारक राज्य संरक्षित स्मारकाच्या शासन निर्णय १५ जानेवारी १९७० अन्वये राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले होते. कृषिभूषण साहेबराव पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी वेस (दगडी दरवाज्याच्या) स्मारक दुरुस्तीबाबत पाठपुरावा सुरू केला होता. त्यावेळी सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग यांनी दखल घेत २९ मे २००९ रोजी देखभाल व दुरुस्तीबाबत काही अटींवर परवानगी देण्यात आली होती.

READ ALSO

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

दगडी दरवाजाचा पूर्वेकडील बुरुज २४ जुलै २०१९ रोजी पावसामुळे क्षतिग्रस्त झाला होता,त्यामुळे तात्पुरती गोण्यांची व्यवस्था करण्यात आली,परंतु भविष्यात हा क्षतीग्रस्त भाग पुन्हा कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता असल्याने,खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक इतर रस्त्यावरून वळवण्यात आली होती. या सर्व गोष्टींचा विचार करता अमळनेर वेस(दगडी दरवाजा) या संरक्षित स्मारकाचे जतन दुरुस्ती कामाऐवजी स्मारकाचे महत्व जतन करून अमळनेर शहरातील वाहतुकीची कायम कोंडी सोडवण्यासाठी, शहराची विकास यंत्रणा असलेल्या नगरपरिषद विकास योजनेनुसार(DP व TP) सदरची वेस देखरेख व दुरुस्ती कामाकरिता नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यासाठी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या मागणीनुसार,अमळनेर नगरपरिषदेने ७ जानेवारी २०२० रोजी विशेष सभा क्रमांक ३२ ठराव क्रमांक ६९२ करून तसा प्रस्ताव नगराध्यक्षा सौ.पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासनाला पाठपुरावा केलेला होता.

त्यानुसार वेस(दगडी दरवाजा) संरक्षित स्मारकाच्या यादीतून वगळण्यात यावे ही लोकप्रतिनिधींची मागणी मान्य करून सदर स्मारक नगरपरिषदेकडे हस्तांतरण करण्याचे १९ मार्च २०२० च्या पत्रात प्रस्तावित केले, तथापि कोरोनाच्या प्रभावामुळे शासनाच्या अधिकाऱ्यांसमोर स्मारकाचे सादरीकरण करण्यास अडचणी येत होत्या,म्हणून स्मारकाच्या हस्तांतरणाची अधिसूचना रद्द करून,२६ जून २०२० च्या शासन निर्णय अन्वये संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय मुंबई यांना महाराष्ट्र वैभव,राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजनेअंतर्गत अमळनेर नगरपरिषद यांना संगोपणार्थ १० वर्षासाठी अमळनेर वेस (दगडी दरवाजा) शासनाच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे.

त्याप्रमाणे अमळनेर नगरपरिषद यांनी शासन निर्णय २६ जून २०२० च्या अन्वये २२ ऑक्टोबर २०२० रोजी अमळनेर शहर हद्दीतील वेस(दगडी दरवाजा) साठीचे दुरुस्ती व संवर्धनाच्या कामाचे आदेश ठेकेदार अमन कन्स्ट्रक्शन यांना रक्कम १ कोटी १२ लाख ९९ हजार २७३ रुपये याप्रमाणे ठेका देण्यात आला.

सदर कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष बिजू लांबोळे, नगरसेवक मनोज दाजीबा पाटील,नरेंद्र संदनशिव,संजय पाटील,निशांत अग्रवाल,विवेक पाटील,रवि पाटील,बाबू साळुंखे,यनेश्वर पाटील,दीपक पाटील,साखरलाल महाजन,बबली पाठक,प्रताप शिंपी व नगरपरिषदेचे इतर नगरसेवक तसेच योगेश मुंदडे,विनोद भय्या,विक्रांत पाटील,हरी भिका वाणी,रणजित शिंदे,संदीप घोरपडे,सुभाष चौधरी,संतोष लोहेरे,पिंगळे डॉक्टर,भागवत गुरुजी,कमल दलाल,शेखा हाजी,फय्याज पठाण,सत्तार तेली,सुरेश पाटील,एल.टी.पाटील, ठेकेदार चेतन शहा,चेतन सोनार,मुख्याधिकारी विद्या गायकवाड व नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी अमळनेर नागरी हित समितीतर्फे अशोक पवार तसेच राजे संभाजी मित्र मंडळाचे पंकज चौधरी यांनी कृषिभूषण साहेबराव पाटील व पुष्पलता पाटील यांचा सत्कार केला.

सदर दगडी दरवाजा नगरपरिषदेला देखभाल व दुरुस्तीसाठी हस्तांतरित करण्याकामी आमदार अनिल भाईदास पाटील,तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे,प्रांत सीमा अहिरे,तहसीलदार मिलिंद वाघ आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

नगरपालिकेच्या तिजोरीवर भार पडणार
सदर कामासाठी १ कोटी १२ लाख, ९९ हजार २७३ रुपये प्रस्तावित आहेत.नगरपालिकेच्या तिजोरीवर जरी भार पडणार असला तरी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी याकामासाठी ५० लाखापेखा जास्तीचा निधी शासनाकडून आणण्याचे या प्रसंगी मान्य केले आहे,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातील हा एक प्रकल्प आहे.खऱ्या अर्थाने स्मारक नव्याने उभं राहिल्यानंतर त्यांची ती स्वप्नपूर्ती ठरेल.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

August 23, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 ऑगस्ट 2026 !

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2026 !

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज २५६ रुग्णांची कोरोनावर मात ; १७८ नवीन बाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्यात अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी साताऱ्याच्या चौघांना अटक ; ६ गावठी पिस्तूलासह ३० काडतूसे जप्त !

August 18, 2022

वरणगावात 261 नर्मदेश्वर शिवलिंगाचे वाटप ; 51 कुमारिका पूजन आणि भंडारा !

August 30, 2023

भुसावळ शहर पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी प्रेम परदेशी यांची बिनविरोध निवड

January 7, 2021

जळगाव जिल्ह्यात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू !

November 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group