भुसावळ (प्रतिनिधी) शहरात गेल्या वर्षांपासून सुरु असलेल्या खडका रोडवरील ‘बीसीएन’ (भुसावळ केबल नेटवर्क) च्या कार्यालय सील करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
एखाद्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी ज्या पद्धतीने सापळा रचला जातो व कारवाई केली जाते अशाच पद्धतीने खडका रोडवरील रजा टॉवरसमोर असलेल्या बीसीएन कार्यालयावर पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तासह ही कारवाई करण्यात आली आहे. कार्यालयावर जळगावचे पोलीस उपाधीक्षक कुमार चिंधा, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, याशिवाय मलकापूरचे प्रांताधिकारी मनोज देशमुख आदींसह पथकाने सदर कार्यालय सील केले.
दरम्यान, फ्री टू एअर चॅनल लोकल चॅनल नोंदणीविषयी त्रुटी आढळल्याच्या कारणामुळे कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर बीसीएनवरून केबलच्या माध्यमातून विविध चॅनल्सचे प्रसारण त्वरित बंद करण्यात आले.