TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात रंगला कुस्त्यांचा जोरदार आखाडा..

महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील व भारत केसरी शमशाद शेख यांच्यात थरार

vijay waghmare by vijay waghmare
April 19, 2025
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) हनुमान जयंतीनिमित्त आज रोजी खऱ्या कुस्त्यांचा आखाडा धरणगावातील इंदिरा गांधी विद्यालयाच्या मैदानात रंगला.

या मैदानात चांदीची गदा व १ लाख रुपये बक्षिसाची कुस्ती पुणे येथील महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, दिल्ली येथील भारत केसरी शमशाद शेख यांच्यात चितपट न होता बरोबरीने सोडण्यात आल्याने दोघंही मल्लांना चांदीची गदा आणि १ लाख रुपये रोख विभागून देण्यात आले. तसेच ठेक्याचे ६२ मल्लांची रंगतदार कुस्त्या झाल्या. तत्पूर्वी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेनेचे नेते गुलाबराव वाघ, भाजपचे नेते तथा उद्योजक भगवान महाजन, भाजपचे नेते ॲड. संजय महाजन, नगराध्यक्ष निलेश चौधरी, नपाचे गटनेते विनय भावे, नगरसेवक कैलास माळी, शहरप्रमुख विलास महाजन, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन ॲड.व्ही एस भोलाणे, ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन, महेंद्र महाजन, भागवत चौधरी, ॲड. शरद माळी यांसह उपस्थित पत्रकार बांधवांच्या हस्ते आखाड्याचे व हनुमंतरायाच्या प्रतिमेचे पूजन करून कुस्त्यांची सुरूवात करण्यात आली.

READ ALSO

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

या आखाड्याच्या निमित्ताने लोकसभा, विधानसभा, असो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परस्परविरोधी भूमिका घेणारे राजकीय नेते कुस्ती आखाड्यात खिलाडूपणे सहभागी झाले. त्यामुळे राजकीयदृष्ट्या महत्व असलेल्या गावांत पुन्हा एकदा एकोपा निर्माण झाला. म्हणून धरणगावात कुस्तीला विशेष महत्व आहे. गेल्या दहा वर्षांपासून चंदनगुरु क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने कुस्त्या आयोजित केल्या जातात. कुस्त्यांची सुरुवात ५०० रुपयांच्या लहान मल्लांपासून शेवटची कुस्ती चांदीची गदा व रोख स्वरूपात १ लाख रुपये बक्षिसाची होती. देशातील, राज्यभरातील नामांकित मल्ल या आखाड्यात हजेरी लावतात. त्यामुळे धरणगावच्या कुस्ती आखाड्याचा नावलौकिक आहे.

या फडात सर्वच स्तरातील नागरिक आणि सर्वच राजकीय पक्षाचे नेते आपले राजकीय मतभेद विसरून कुस्तीला बळ देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे गावात राजकारणाच्या पलीकडे कुस्तीचा रगेल आखाडा अजूनही टिकून असल्याचे आखाड्याचे संयोजक तथा चंदनगुरु क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिलीप पहिलवान महाजन यांनी सांगितले. तसेच गावात खेळताना लोकांचे जितके प्रेम असते त्याहीपुढे जिंकण्याच्या अपेक्षांचा दबाव असतो, असे कुस्तीचे पंच किशोर पहिलवान, अनिल पहिलवान, रघुनाथ पहिलवान, शाहरुख पहिलवान यांनी सांगितले.

कुस्तीचे आयोजन यशस्वीतेसाठी चंदनगुरु क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिलीप महाजन, उपाध्यक्ष अनिल महाजन, चंद्रकांत सोनार, खजिनदार पप्पू कंखरे, सह खजिनदार राजेंद्र वाघ, सचिव गुलाब महाजन, सहसचिव किशोर पवार, सदस्य प्रकाश मराठे, नंदू करोसिया, विनोद माळी, किशोर महाजन, कोमल शुक्ल, शाहरूख खाटिक, गोरख माळी, भावेश पाटील, जगदिश मराठे, ईश्वर चौधरी, भागवत मराठे, चंदन पाटील, हरी महाजन, गोपाल पाटील, ललित मराठे, रघुनाथ माळी, अनिल महाजन, रमेश महाजन, सुरज सूर्यवंशी यांसह मंडळाचे सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद रोकडे यांनी तर सूत्रसंचलन पी डी पाटील यांनी केले. तसेच उपस्थित मान्यवरांचे, पहिलवानांसह कुस्तीप्रेमींचे आभार ॲड. संजय पहिलवान महाजन यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: A fierce wrestling match took place in Dharangaon..Dhrngoan

Related Posts

धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
Next Post

साप्ताहिक राशिभविष्य 20 एप्रिल ते 26 एप्रिल 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ४ कोरोनाबाधित, ६ झाले बरे !

July 25, 2021

शॉकींग : एकाच घरात आढळले ६ मृतदेह

November 12, 2020

नागपूर : प्रेमी युगलाने सोबत घेतला टोकाचा निर्णय !

September 6, 2023

जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमधील सहकाऱ्यांकडून महात्मा गांधीजींना श्रद्धांजली !

January 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group