जळगाव (प्रतिनिधी) भुसावळात २९ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्यावर गोळीबार करत निर्घृण खून केला होता. या प्रकरणी १० ते ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन ते तीन जणांना ताब्यात घेतले असल्याचेही कळते.
संतोष बारसे यांचे लहान भाऊ मिथुन मोहन बारसे (वय ४१, रा. मोहन पहिलवान नगर, भुसावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मागील आठवड्यात पाण्याच्या टँकरवरून संतोष बारसे आणि संशयित आरोपी शिव पथरोड, विनोद चावरीया, विष्णू पथरोड, सोनू पंडित, राजू सूर्यवंशी, बंटी पथरोड, करन पथरोड, नितीन पथरोड यांच्यासह दोन ते तीन अशा लोकांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे सर्वांनी मिळून कटकारस्थान रचत संतोष बारसे आणि सुनील राखुंडे या दोघांचा बुधवार दि. २९ मे रोजी अज्ञात हल्लेखोरांनी कारमध्ये बसलेले असताना बेछुट गोळीबार करून खून केला.
या प्रकरणी शिव पथरोड, विनोद चावरीया, विष्णू पथरोड, सोनू पंडित, राजू सूर्यवंशी, बंटी पथरोड, करन पथरोड, नितीन पथरोड आणि आणखी दोन ते तीन अशा दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे हे करीत आहेत. दरम्यान, रात्री घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी राजकुमार शिंदे यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट दिली.