भुसावळ (प्रतिनिधी) अप कर्नाटक एक्स्प्रेसमधून सव्वा लाख रुपयांचा गांजा शुक्रवार, 2 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाने गस्तीदरम्यान जळगाव-शिरसोलीदरम्यान जप्त केला होता. या प्रकरणी अटकेतील समशोद्दीन ऐनोद्दीन पिंजारी (62, घर नं.89, सर्वे नं.55, शफीनगर, मालेगाव, जि.नाशिक) यास अटक करण्यात आल्यानंतर त्याने हा गांजा सप्लायर हासीराम चव्हाण याने दिल्याची कबुली दिली. यानंतर दुसर्या आरोपीच्या चोपड्यातून मुसक्या आवळण्यात आल्या. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास 7 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
रॅकेटचा व्हावा पर्दाफाश
यापूर्वीदेखील रेल्वेतून गांजाची तस्करी उघड झाली असून या माध्यमातून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, संशयीत समशोद्दीन ऐनोद्दीन पिंजारी हा 12628 अप कर्नाटक एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक एस- 3 मधून विनातिकीट प्रवास करीत असताना रेल्वे सुरक्षा बलाने त्यास पकडत त्याच्या सामानाच्या झडतीदरम्यान सव्वा लाखांचा गांजा जप्त केला होता. संशयीताने पोलिस कोठडीत हा गांजा चोपडा येथील हासीराम चौहाण याने दिल्याचे सांगितल्यानंतर त्यासदेखील चोपडा बसस्थानकासमोरून अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयाने 7 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
यांनी केली कारवाई
लोहमार्गचे निरीक्षक विजय घेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेद्र पाटील, अजीत तडवी, जगदीश ठाकूर, धनराज लुले, संजय मिर्झापुरे यांनी आरोपीच्या मुसक्या बांधल्या.