जळगाव (प्रतिनिधी) कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून भुसावळ-इगतपुरी रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या होत्या. प्रवाश्यांची गैरसोय लक्षात घेता भुसावळ रेल्वे प्रशासनाने भुसावळ- इगतपुरी मेमू रेल्वे सेवेला १० जानेवारी म्हणजेच आजपासून सुरूवात करण्यात आली आहे.
कजगाव रेल्वे स्टेशनवर सकाळी ९.१५ वाजता रेल्वे गाडीचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अनिल महाजन, रवींद्र पाटील, आशिष वाणी, शफी शेठ मणियार, अनिल महाजन, भानुदास महाजन, संजय महाजन, अनिस मणियार, धैर्यशील पाटील यांच्यासह रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.
















